पुणे

कमी वयातील हृदयरोग ..कारणे व उपाय

CD

कमी वयातील हृदयरोग ..कारणे व उपाय

काही वर्षांपूर्वी हृदयरोग वयाच्या ५० ते ६० वर्षानंतर होणारा आजार अशी समजूत होती. मात्र, आता कमी वयात म्हणजे ३० व ४० वर्षातही हृदयविकाराचा झटका (हार्टॲटॅक) येण्याची अनेक उदाहरणे समोर येतात. याबाबत उपचार जितके महत्त्वाचे असतात तितकेच ॲटॅक येऊ नये म्हणून योग्य काळजी घेणे गरजेचे असते.
- डॉ. राजीव खरे

हृदयविकारानंतरचे उपचार जसे महत्त्वाचे असतात तसेच हा विकार होऊ नये यासाठी काही काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. या बाबतची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे, कारण कोणावर कधी कोठे कसा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. हृदयरोग विकाराच्या वाढत्या प्रमाणामुळे जवळपास प्रत्येक घरातच एक हृदयविकाराचा एक तरी रुग्ण हमखास सापडतोच.

बहुतेक वेळा आम्ही बघतो की रुग्णाला जेव्हा उच्च रक्तदाब किंवा मधुमेह अशा आजाराचे निदान होते. त्यावेळेस त्या आजाराकडे बघण्याचा पेशंटचा दृष्टिकोन फारच किरकोळ असतो. आपल्याला फार काही झालेलेच नाही, असे रुग्णाला वाटत राहते. या आजारावर योग्य उपचार वेळेत न घेतल्यास हृदयविकाराचा धोका शंभर पटीने वाढू शकतो.
बदलत्या जीवनशैलीमुळे हा धोका अधिकच वाढत चालला आहे. पूर्वी भारतीय माणसाचे सरासरी वजन ५० ते ६० किलो दरम्यान असायचे. आता सरासरी वजनाची मर्यादा ८० किलोपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
वाढती स्थूलता चिंतेचा विषय बनत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न न होणे व त्याचा विपरीत परिणा शरीरावर होऊन हृदयविकाराचा धोका वाढला आहे.
वाढते जागरण, अपुरी झोप व ताणतणाव या मुळे हृदयरोगाचा धोका कमालीचा वाढला आहे. योग्य वेळी झोपणे व पहाटे उठण्याने हा धोका कमी होतो. एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की ज्यांची रात्रीची झोप कमी आहे, अशांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक राहतो. जीवनशैली नीट असणे गरजेचे आहे. आहारामध्येही पथ्य पाळणे गरजेचे आहे.
हृदयविकाराचा त्रास आहे अशा रुग्णांनी योग्य सल्ला घेतल्यास व नियमित तपासण्या केल्या तर त्यांना या पासून दूर राहता येते. अनेकदा हृदयविकाराची लक्षणे लक्षात न आल्याने जिवावर बेतू शकते, त्या मुळे वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर प्रत्येकाने आपल्या नियमित तपासण्या करणे हिताचे ठरते.

हृदयविकार टाळण्यासाठी या बाबी करा
* रोज एक तास व्यायाम करणे
* वजन ६० ते ६५ किलो च्या दरम्यान ठेवणे
* रात्री जेवण लवकर करणे
* आठ तास झोप घेणे गरजेचे आहे.
* मधुमेह व उच्च रक्तदाब असेल, अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा रुग्णाने दर महिन्याला तपासणी करणे व गोळ्या घेणे आवश्यक आहे.

..............................
दरवर्षी कोणत्या तपासण्या कराव्यात
* इ सी जी
* टू डी इकोकॉर्डियोग्रफी
* स्ट्रेस टेस्ट (TMT)
* ब्लड शुगर


डॉ. खरे क्लिनिक व टू डी इको सेंटर,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, इंदापूर रोड,
बारामती. संपर्क- ९७००४८२००५
शस्त्रक्रिया- अँजिओग्राफी- पेसमेकर-अँजिओप्लास्टी
तपासण्या- ईसीजी- स्ट्रेस टेस्ट- होल्टर टेस्ट.
09059

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT