पुणे

मतदारांचा कौल निर्णायकी

CD

बारामती, ता. २ : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात शिगेला पोचला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यात येथे लढत होत असल्याने साऱ्या देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असेच या लढतीचे स्वरूप असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी प्रचारात केला आहे. मात्र मतदारांच्या मते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असेच या लढतीचे स्वरूप आहे. बारामतीच्या विकासात या दोन्ही नेत्यांचा मोठा वाटा असल्याने ही लढत रंगतदार बनली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी बाजू बदलली असली तरी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी त्यांची बाजू सांभाळली आहे. त्यामुळे मतदारांची सहानभती हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या बदलत्या परिस्थितीत अजित पवार यांची भिस्त पूर्णपणे भाजपवर असल्याचे दिसत आहे.

या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतील राज्यातील सर्वच नेत्यांच्या या मतदारसंघात सभा झाल्या. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांप्रमाणेच बारामतीच्या विकासाचे श्रेय कोणाकडे, यावर भर देण्यात आला. विकास कोणी केला, हा श्रेयवाद अजित पवार यांच्याकडून रंगवण्यात येत आहे.
खडकवासला मतदारसंघाने गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला मोठी साथ दिली आहे. प्रामुख्याने पुण्याच्या उपनगरातील सोसायट्यांचा भाग या मतदारसंघात येतो. वाहतूक कोंडी, बेरोजगारी, सोसायट्यांमधील पाण्याचा प्रश्न, सिंहगड पर्यटन, नागरी समस्या हे येथील मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपच्या उमेदवाराला काठावर विजय मिळवता आला. त्यामुळे सुळे यांनी येथे जोर लावला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी येथे मोठ्या सोसायट्यांना भेटी देण्यास प्राधान्य दिले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार हेच आमदार आहेत. बहुसंख्य सहकारी व इतर संस्थांवर राजकीय फुटीनंतरही त्यांचेच वर्चस्व आहे. जुने जाणते नेते शरद पवार यांच्यासोबत असले तरी बहुसंख्य पदाधिकारी मात्र अजित पवारांसोबत आहेत. सुप्रिया सुळे यांनी जनतेला भावनिक हाक दिली आहे. त्यामुळे पदाधिकारी विरुद्ध जनता असा यंदाचा सामना बारामतीत दिसेल.
इंदापूरमध्ये नेतेमंडळी एका बाजूला व जनता दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. दोनही बाजूंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही जोरदार आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये मोठी चुरस अपेक्षित आहे.
दौंडमध्ये नागरी समस्या, रेल्वेचे प्रश्न यासह अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत. बहुतांश नेते महायुतीकडे असले तरी सुळे यांना मिळणार प्रतिसादही मोठा आहे. शरद पवार यांनी जुन्या सहकाऱ्यांना साथ दिली आहे. त्यामुळे येथील मतदार कोणाला कौल देणार याची उत्सुकता आहे. पुरंदर तालुक्यात पुरंदरचे विमानतळ, गुंजवणीचे पाणी या सारखे प्रश्न निवडणुकीवर परिणाम करणारे ठरू शकतात.
भोर तालुक्यात एमआयडीसी, पाण्याचा प्रश्न, अपूर्ण कामे, पर्यटनाकडे दुर्लक्ष आदी मुद्दे प्रचारात अग्रक्रमावर आहेत. विविध पदाधिकाऱ्यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची असेल.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातील नेत्यांची भाऊगर्दी आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात दिसणारी सर्वसामान्य नागरिकांची गर्दी येथील लढत काट्याची होणार हेच दाखवून देत आहे. नेत्यांनी जमविलेली राजकीय समीकरणे लोकांच्या पचनी पडणार की लोक काही वेगळा निर्णय घेणार, हे ठरविणारी यंदाची निवडणूक ठरणार आहे. कागदावर बलाबल काहीही दिसत असले, तरी मतदानाच्या दिवशी मतदार राजा कोणाच्या नावासमोरील बटण दाबणार, याचा अंदाज वर्तविणे कठीण आहे. पदाधिकाऱ्यांनी कागदावर गणिते मांडली असली तरी मतदार कोणासमवेत राहणार हे गुलदस्तात आहे. परंपरागत विरोधक मांडीला मांडी लावून बसलेले पाहताना अनेकदा लोकांनाही नेमके काय सुरु आहे, हेच समजेनासे झाले आहे. मतदार राजा यात नेमकी काय भूमिका घेणार, यावरच बारामतीत विजयाचे गणित अवलंबून असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT