पुणे

ग्रामपंचायत निवडणुकांचे वाजले पडघम

CD

चास, ता. १३ ः खेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजले असून, सुमारे पंचवीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर २१ ग्रामपंचायतींच्या ३२ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी तालुक्याच्या पश्चिम पट्यातील मोरोशी, डेहणे, वाळद, एकलहरे, तिफनवाडी, धुवोली व भोमाळे या सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर शेंदुर्ली, मोहकल, धामणगांव खुर्द, पापळवाडी या गावांमध्ये पोटनिवडणूक होणार असल्याने मतदारांची मात्र दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होणार असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे.


कोणतीही निवडणूक म्हटली की, पैशाचा धूर हा आलाच! कारण पैशाशिवाय निवडणुका हे केवळ स्वप्नच राहिले असून, निवडणुकीत पैशाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुका या दिवाळीपूर्वी होऊन निकालही दिवाळीपूर्वीच असल्याने प्रत्यक्षात या गावांमधील मतदार दोनदा दिवाळी अनुभवणार हे मात्र नक्की! शिवाय मुख्य दिवाळीही जोरदार साजरी होणार.

राज्यातील लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजल्याने इच्छुक उमेदवारांची आणि लोकमतातुन निवडून येणाऱ्या संरपचपदासाठी असणाऱ्या इच्छुकांची धावपळ वाढली आहे. सोमवार (ता.१६) ते शुक्रवार (ता. २० ऑक्टोबर) पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. सोमवार (ता.२३) उमेदवारी अर्जांची छाननी, बुधवार (ता. २५) दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे व त्यानंतर चिन्ह वाटप होणार आहे. रविवार (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होऊन सोमवारी (ता. ६ नोव्हेंबर) सकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT