पुणे

खेडमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

CD

चास, ता.६ : खेड तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाचे आगमन होताच खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होणार आहे.
यंदा सर्वत्र वळवाचा झालेला दमदार झालेला पाऊस व त्यातच मॉन्सून वेळेवर दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज यामुळे साहजीकच शेतकऱ्यांनी शेतीची कामे लवकर सुरू केली. मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरवातीलाच मॉन्सून पूर्व पावसाने जोमदारपणे हजेरी लावल्याने शेतकरी प्रफुल्लीत होऊन पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतला होता.
मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. सध्या शेतजजमिनी नांगरून पेरण्यासाठी सज्ज ठेवल्या आहेत. दमदारपणे पाऊस बरसण्याची शेतकरी वाट पाहतो आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात खरीप हंगामात सुमारे ३२०० ते ३३०० हेक्टर क्षेत्रावर भाताच्या लागवडी करण्यात येत असून, अन्य पिकाचे क्षेत्र हे कमी असून थोड्याफार प्रमाणात कडधान्ये तसेच बाजरी वा अन्य पिकांच्या पेरण्या केल्या जातात.

02243

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT