पुणे

दौंड येथे बाजरीच्या बाजारभावात वाढ

CD

दौंड, ता. २६ : दौंड तालुक्यात बाजरीची आवक कमी झाली आहे. यामुळे बाजारभावात पन्नास रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीची एकूण ९३ क्विंटल आवक झाली आहे. त्यास किमान १९०० तर कमाल २७५० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात बाजरीस किमान १९०० तर कमाल २७०० रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ८३३५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ३५० तर कमाल १८०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. केडगाव उपबाजारात चवळीची तीन क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ११००० तर कमाल १२००० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
तालुक्यात लिंबाची १५० डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान १५१ व कमाल ३३१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे. फ्लॉवरची ३३० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १०० ; तर कमाल ४०० रुपये दर मिळाला आहे. तालुक्यात कोथिंबिरीची १३५२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०० तर कमाल ३०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो -८००, वांगी -४५०, दोडका-५२०, भेंडी-४००, कार्ली -४००, हिरवी मिरची-४००, गवार-७००, भोपळा-१००, काकडी-१५०, शिमला मिरची-५५०, कोबी-१२०.


शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू ७९९ २०५१ २९९०
ज्वारी २०८ ३४५० ६१९०
बाजरी ०९३ १९०० २७५०
हरभरा ०७१ ४००० ४७५१
मूग ००४ ६००० ८०००
मका ०६६ १९०० २२५१

टोमॅटो व गवारच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची ८५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ८०० रुपये असा दर मिळाला आहे. तालुक्यात गवारीची ७० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३०० तर कमाल ७०० रुपये असा दर मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT