पुणे

पोलिस भरती परीक्षेत कॅापी

CD

दौंड, ता. २६ : राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र पोलिस कॅान्स्टेबल परीक्षेच्या लेखी परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी तीन परीक्षार्थ्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे रक्षण करीत गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींवरच गुन्हा दाखल करण्याची वेळ दौंड पोलिसांवर आली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचमधील सशस्त्र पोलिस कॅान्स्टेबल पदाच्या परीक्षेसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. दौंड-कुरकुंभ महामार्गालगतच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात ही परीक्षा सुरू होती. विद्यालयातील वर्ग क्रमांक अठरामधील उमेदवार प्रदिप आबासाहेब गदादे (रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. नगर), सुदर्शन उत्तमराव बोरुडे (रा. श्रीगोंदा, जि. नगर) व सतीश शिवाजी जाधव (रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा) हे कॉपी करताना आढळले.
या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस नाईक नीलेश धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक महेश आबनावे यांनी दिली. उपनिरीक्षक राऊत या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT