daund bajar samiti 
पुणे

Market Rates: बटाटा दर वधारले, टोमॅटोचे घसरले; दौंड येथील बाजारात गव्हाची आवक घटली

CD

दौंड , ता. १० : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात गव्हाची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. गव्हाची ५४५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २१०० रुपये; तर कमाल ३३०० प्रतिक्विंटल, असा असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची ७७६ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २१०० व कमाल ३१०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.


भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. कोथिंबिरीची ७११० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ३३०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० व कमाल १८०० रुपये असा बाजारभाव मिळाला. शेपूची १२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल १००० रुपये असा बाजारभाव मिळाला. कांदापातीच्या ५०० जुडींची आवक होऊन त्यास शेकडा किमान ९०० व कमाल ११०० रुपये असा बाजारभाव मिळाला. लिंबाची १४१ डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान १५० व कमाल ३२५ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे.

केडगाव उपबाजारात कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल पाचशे रूपयांची घट झाली आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ४६८९ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ६०० ; तर कमाल २२०० रुपये असा भाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ११६३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ५०० ; तर कमाल २७०० रुपये असा भाव मिळाला होता.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ५४५ २१०० ३३००
ज्वारी ११५ २२५० ५०००
बाजरी २७८ १९०० ३०००
हरभरा ०२० ४००० ५४००
तूर ०९१ ७००० ८२००
मका ०९० १८०० २२५०

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे ( प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर ) : बटाटा-२२०, आले -८००, गाजर-३५०, वटाणा-५००, काकडी-२१०, भोपळा-२००, कोबी-१६०, फ्लॅावर-४००, टोमॅटो-३००, हिरवी मिरची-५००, भेंडी-८७०, कार्ली -७२०, दोडका-७००, वांगी-७००, शिमला मिरची-६००, शेवगा-७००, गवार-१२७०, घेवडा- ७००, बिट-३००.


बटाटा दर वधारले, टोमॅटोचे घसरले
तालुक्यात बटाट्याची २७४ क्विंटल आवक झाली असून प्रति दहा किलोसाठी किमान १४० तर कमाल २२० रुपये असा दर मिळाला. मागील आठवड्यात बटाट्याची ३०४ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिदहा किलोसाठी किमान १४० तर कमाल १७० रुपये असा दर मिळाला होता.
टोमॅटोची १११ क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल ३०० रुपये असा दर मिळाला. मागील आठवड्यात टोमॅटोची ८० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल ३५० रुपये असा दर मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT