Bridge Collapsed sakal
पुणे

Bridge Collapsed : दौंडमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला;निकृष्ट बांधकामाच्या तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

पुणे व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे खांब कोसळले. वीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या पुलाच्या अन्य खांबाचे कॉंक्रिट निघाल्याने ते देखील कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

दौंड : पुणे व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे खांब कोसळले. वीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या पुलाच्या अन्य खांबाचे कॉंक्रिट निघाल्याने ते देखील कोसळण्याच्या स्थितीत आहेत. निकृष्ट बांधकाम प्रकरणी ग्रामस्थांनी लेखी तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते.

दौंड शहरातून वाहणाऱ्या भीमा नदीवर दौंड शहर ते गार (ता. श्रीगोंदा, जि. नगर) दरम्यान १९ कोटी ९९ लाख रुपये खर्च करून पूल उभारला जात आहे. सध्या दौंड येथून नदी पात्रात होडी मार्गे गार व त्यापुढील गावांना जावे लागत आहे. दौंड शहराला गारमार्गे नगर जिल्ह्यातील आर्वी, अजनूज, अनगर, आदी गावे या प्रस्तावित पुलामार्गे जोडली जाणार आहेत. पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाचे बांधकाम सुरू आहे. उन्हाळ्यात धरणक्षेत्रात पाणी आटल्याने सध्या नदी पात्रात तुरळक पाणी आहे. निर्माणाधीन पुलाचे दोन मोठे खांब पाया कच्चा असल्याने आणि निकृष्ट बांधकामामुळे कोसळले आहेत.

या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाविषयी विनायक मगर यांच्यासह गारच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली होती. नदी पात्रात दीड महिन्यापूर्वी पाणी नसताना पुलाच्या काही खांबांचे कॉँक्रिट पूर्णपणे निघून त्यामधील लोखंडी सळ्या दिसू लागल्याने आणि खांब कलल्याचे निदर्शनास आणून देत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे खांब कोसळले.

दोन खांब कोसळल्यानंतर पुलाच्या अन्य खांबांचे काम देखील निकृष्ट असल्याची बाब पुढे आली आहे. नदी पात्रात असलेल्या अन्य खांबांच्या वरच्या बाजूला तडे गेले आहेत, तर खालच्या भागाचे कॉंक्रिट पूर्णपणे निघून गेले आहे. पुलाच्या कामातील वाळू व सिमेंट मिश्रणाच्या गुणोत्तरामध्ये त्रुटी आहेत. पुलासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्यांविषयी देखील तक्रारी आहेत.

खांब कोसळल्यानंतर सोमवारी (ता. १०) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत कामाची पाहणी केली नाही. याबाबत दौंड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एम. आर. सोनवणे यांना विचारले असता त्यांनी, पुलाचे दोन खांब कलल्याने ते पाडून टाकण्याचा निर्णय झाला होता व तसे कंत्राटदाराला कळविण्यात आले होते, असा दावा केला.

  • पुलाचे काम दृष्टीक्षेपात
    - पुलाची अंदाजपत्रकीय रक्कम : १९. ९९ कोटी रुपये
    - लांबी : ३२० मीटर
    - कार्यारंभ आदेश : २६ मे २०२२
    - काम सुरू : डिसेंबर २०२२
    - कामाची मुदत : २४ महिने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT