पुणे

दौंडमध्ये बाजारीची आवक घटली

CD

दौंड, ता. १० : दौंड तालुक्यात बाजरीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतिक्विंटल दहा रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. बाजरीची २१४ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान १८०० तर कमाल ३११० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे दौंड मुख्य बाजार व केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक आणि बाजारभाव स्थिर आहे. यवत व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक आणि बाजारभाव स्थिर आहेत. केडगाव उपबाजारात चवळीची नऊ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल किमान १३००० व कमाल १६५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला आहे.

कोथिंबिरीची ६५७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची २००० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल २००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपूची २०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल २००० जुडी असा बाजारभाव मिळाला. केडगाव उपबाजारात लिंबाची ७० डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ४०० व कमाल ७५० रुपये प्रतिडाग असा बाजारभाव मिळाला आहे.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान ( रू . ) कमाल ( रू . )
गहू ४८९ २२०० ३२२१
ज्वारी २७४ २१०० ३२००
बाजरी २१४ १८०० ३११०
हरभरा ०३२ ५८०० ६४१०
मका ०२६ २१०० २५५०
मूग ००८ ६००० ८०००

बाजारभाव पुढीलप्रमाणे : बटाटा-३२०, आले-१०००, गाजर-२५०, काकडी-१८०, भोपळा-१५०, कोबी-२००, फ्लॅावर-६००, टोमॅटो-७५०, हिरवी मिरची-६००, भेंडी-६५०, कार्ली-६००, शिमला मिरची-६००, शेवगा-१०००, गवार - १०००, भुईमूग शेंग - ६००.


बटाटा व टोमॅटोचे दर वधारले ....
बटाट्याची २६३ क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलोसाठी प्रतवारीनुसार किमान २२० तर कमाल ३२० रुपये असा दर मिळाला. टोमॅटोची ६१ क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलोसाठी प्रतवारीनुसार किमान १०० तर कमाल ७५० रुपये असा बाजारभाव मिळाला. केडगाव येथील उपबाजारात कांद्याची ८८७५ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान १६०० तर कमाल ३३०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT