पुणे

निमोणे येथे ॲल्युमिनिअमच्या रोहित्राचे लोकार्पण

CD

गुनाट, ता. २ : निमोणे (ता. शिरूर) येथे ॲल्युमिनियमच्या ११ केव्ही रोहित्राचे रविवारी (ता.३०) आमदार अशोक पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रोहित्रामुळे चोऱ्या थांबून अखंडित तसेच पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


शिरूर तालुक्यात वर्षभरात ४०० रोहित्रांची चोरी झाली आहे. त्याला आळा घालण्यासाठी व योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी ॲल्युमिनियमचे रोहित्र बसविले आहे, असे पवार यांनी उद्‌घाटनप्रसंगी सांगितले. दरम्यान ११kvच्या रोहित्रासाठी सबस्टेशनची गरज असते. ही गरज ओळखूनच पवार यांनी आलेगाव पागा, गणेगाव दुमाला, निमोणे, टाकळी हाजी आदी गावांत सबस्टेशन उभारली आहेत. यामुळे शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.


लोकार्पणप्रसंगी सरपंच सुषमा काळे, माजी सरपंच संजय काळे, श्‍याम काळे, बी. व्ही काळे यांसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

महावितरणला मिळाला मोठा दिलासा
शिरूर तालुक्यात कॉपर वायंडींग ट्रान्सफॉर्मरच्या चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चोरीमुळे कोट्यवधी रुपयांचा फटका महावितरणला व पर्यायाने शेतकऱ्यांनाही बसतो. ॲल्युमिनियम रोहित्रामुळे महावितरणला मोठा दिलासा मिळाला आहे.


असे रोहित्राचे वैशिष्ट्य
१. रोहित्रात तांब्याच्या तारांऐवजी ॲल्युमिनियमच्या तारांचा वापर केला आहे.
२. ॲल्युमिनियमचा चोरट्यांना काहीच फायदा होणार नसल्याने याची चोरी होणार नाही.
३. विजेचा दाब चांगल्या प्रमाणात मिळतो.
४. रोहित्र नादुरुस्त झाल्यास तीनच दिवसांत दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होते.
५. दुरुस्तीचा ट्रान्सफॉर्मर मिळून पिकांचे होणारे नुकसान टळेल.
६. विद्युत भार कमी झाल्याने पुरवठा वारंवार खंडित होणार नाही.

एक ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला तरी त्यामागे सुमारे तीन लाखांचे नुकसान महावितरणला सोसावे लागते. शिवाय विजेअभावी शेतकऱ्यांची पिके जळणे व दुरुस्तीसाठी पैसे जमा करणे असा दुहेरी आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागतो. यासाठी ॲल्युमिनियमचे रोहित्र कदाचित राज्यात यशस्वीपणे राबवलेला हा पहिलाच प्रयोग असेल.
- अशोक पवार, आमदार शिरूर हवेली.

रोहित्रांच्या चोरीमुळे व विजेच्या सततच्या लपंडावामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला होता. चासकमानच्या अस्तरीकरणाच्या पाठोपाठ आमदार अशोक पवार यांनी आता वीजेचा प्रश्नही हाती घेतल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
- संजय काळे, माजी सरपंच, निमोणे


00102

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT