पुणे

नाणेघाटात स्वागत, पण हुल्लडबाजी नको

CD

जुन्नर, ता. २ : ऐतिहासिक नाणेघाटात पावसाळी पर्यटकांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ सज्ज झाले आहे, मात्र नाणेघाट परिसरात वर्षाविहार, भटकंती व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी जबाबदारीने वागण्याची आवश्यकता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, हुल्लडबाजीवर नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी होत आहे.
घाटघर ग्रामस्थ व वनव्यवस्थापन समितीने शनिवारपासून (ता. २९ जून) नाणेघाटाकडे जाणाऱ्या पर्यटकांकडून उपद्रव्य शुल्काची आकारणी देखील सुरू केली आहे. नाणेघाट परिसरातील कोकण कडा याठिकाणी काही प्रेमी युगुलांकडून भरदिवसा अश्लील चाळे केले जात असल्याचे आढळून आले आहे. बऱ्याचदा मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणारे तरुणदेखील आढळून येतात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास होतो. निसर्गप्रेमी पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घाटघर येथे ब्रिटिश काळापासून पोलिस चौकी आहे. जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घाटघर व परिसरासाठी नियुक्त आहेत, मात्र ते इकडे कधी फिरकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात नाणेघाट परिसरात हुल्लडबाज पर्यटकांवर जरब बसण्यासाठी येथे पोलिस कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी माजी सरपंच पोपट रावते यांनी केली आहे.

कचऱ्यामुळे पावित्र्य धोक्यात
सध्या नाणेघाटात पावसाळी वातावरण आहे. यावर्षीच्या वर्षाविहाराला सुरुवातीलाच पर्यटक नाणेघाट परिसरात भटकंती व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत आहे. नाणेघाट परिसरात अनेक व्यावसायिक आपले स्टॉल लावत असतात. हॉटेल व्यवसायदेखील चांगल्याप्रकारे होत असतो. येथे कचऱ्याचे कोणतेही व्यवस्थापन केले जात नाही. त्यामुळे नाणेघाट परिसरात पर्यटकांनी टाकून दिलेला प्लॅस्टिक कचरा व दारूच्या बाटल्यांमुळे नाणेघाटाचे पावित्र्य धोक्यात येणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT