पुणे

जुन्नर वनविभागाच्या पर्यटनस्थळांवर निर्बंध

CD

जुन्नर, ता. ५ : जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील वनविभागाच्या पावसाळ्यातील पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, यासाठी दक्षता घ्यावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व तत्सम कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात असे यावी कळविण्यात आले आहे.


सर्व पर्यटनस्थळावर जाताना मार्गदर्शक सोबत घेऊन जाणे अनिवार्य केले आहे. पर्यटनक्षेत्र परिसरात लावलेल्या सूचनाफलकांचे काटेकोरपणे पालन करणे. जेथे सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग उभारण्यात आलेल्या आहे, त्यापलीकडे जाण्यास मनाई आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यावर प्रतिबंध राहणार आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहण्यास तसेच धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई आहे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे आदीवर बंदी घालण्यात आली आहे.
वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहणे थांबविण्यास मनाई. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणेस बंदी. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्मकॉलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन कृती करण्यावर प्रतिबंध आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे तसेच ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जलप्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करण्यावर बंदी घालण्यात आहे. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे सातपुते यांनी सांगितले.

जुन्नर वनविभागातील निसर्गपर्यटन स्थळे
जुन्नर गडकिल्ले परिसर, किल्ले शिवनेरी, चावंड, जीवधन, हडसर, निमगिरी आदी तसेच धबधबा परिसर आंबोली धबधबा (दाऱ्याघाट), कांचन धबधबा (हातवीज) व रिवर्स वॉटरफॉल (नाणेघाट). ओतूर आडराई जंगल ट्रेक, काळू धबधबा, पिनाकी धबधबा (कोपरे), घारीचा धबधबा (कोपरे), धूरनळी धबधबा (ओतूर).
आंबेगाव तालुका : घोडेगाव, डिंभे रोपवाटीका, डिंभे धरण धबधबा, राजपूर धबधबा, फुलवडे धबधबा, मयांबावाडी धबधबा (शिनोली).
खेड तालुका- भिवेगाव धबधबा, भोमाळे ते वेल्हावळे पाऊलवाट, कुंडेश्वर धबधबा. वांद्रे धबधबा.
जुन्नर तालुक्यातील किल्ले जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी येथे जाण्यास, तसेच नाणेघाट येथे ‘नाणेघाट अंगठा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT