पुणे

जुन्नरमधील नर्सरी व कीटकनाशक केंद्राचा परवाना निलंबित

CD

जुन्नर, ता. ७ : कृषी विभागाने जुन्नर तालुक्यातील तीन विक्रेत्यावर परवाना निलंबनाची कारवाई केली आहे अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक नीलेश बुधवंत यांनी दिली.
यापूर्वी डिंगोरे येथील स्वराज्य कृषी सेवा केंद्र व कुरण येथील साई समृद्धी हायटेक नर्सरी याच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ह्या कारवाईमुळे एकूण पाच जणांचे परवाने निलंबित झाले आहेत. तालुक्यातील मौजे भोरवाडी (हिवरे बुद्रूक) व निरगुडे येथील शेतकऱ्यांची निकृष्ट दर्जाचे बियाणे व रोपांच्या बाबतीत तक्रार प्राप्त झाल्याने नारायणगाव येथील साईबाबा हायटेक नर्सरी व निरगुडे (बेजवाट फाटा) येथील जय हनुमान ऍग्रो सर्विसेस यांच्या विक्री केंद्राची तपासणी बुधवंत यांनी केली होती.
या तपासणीत ग्राहकांना पावत्या न देणे, साठा व भाव फलक प्रदर्शित न करणे, सर्व कंपन्यांचा विक्री परवानामध्ये समावेश न करणे, शिफारस नसलेल्या हंगामामध्ये रोपांची विक्री करणे, विक्री अहवाल सादर न करणे इत्यादी गंभीर बाबी तपासणी दरम्यान आढळून आल्याने त्यांना नोटीस देऊन लेखी खुलासा मागविण्यात आलेला होता. संबंधिताने नोटीसला उत्तर न दिल्याने संबंधित विक्रेत्यावर निलंबनाची कारवाई केली.
तालुक्यातील खोडद येथील कृषिधन हायटेक ह्या कीटकनाशक विक्री केंद्राची तपासणी केली असता ग्राहकांना विक्री बिल न देणे, विक्री परवान्यामध्ये समावेश नसलेल्या कंपन्यांच्या कीटकनाशकांची विक्री करणे, साठा नोंदवही अद्ययावत नसणे, कीटकनाशके विक्रीचा अहवाल परवाना अधिकाऱ्यांना न पाठवणे आदी बाबी आढळून आल्या होत्या. संबंधितास लेखी खुलासा सादर करण्याबाबत कळविले होते. मात्र, वेळेत खुलासा सादर न केल्याने सदर कीटकनाशक विक्री केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT