पुणे

वीज बिल, कर्जमाफीसाठी ठिय्या आंदोलनाचा इशारा

CD

जुन्नर, ता.९ : शेतकऱ्यांना सरसकट वीज बिल व कर्जमाफी करावी. याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास पंधरा दिवसानंतर तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशारा विविध संघटनांच्यावतीने अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी दिला. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना सोमवारी (ता.८) निवेदन देण्यात आले.

निवेदनात राज्य सरकारने शेतकऱ्यांना ७.५ एचपीपर्यंत थकीत असलेली वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. मात्र साडेसात एचपीच्या अधिक अधिभार वापरणारे शेतकरी नदी अथवा धरणांमधून भागीदारी पद्धतीने लिफ्ट करत असतात. जेणेकरून त्यांना मेंटनस अथवा येणारे बिल विभागून भरता येते. सरकारने ७.५ एचपी पेक्षाअधिक अधिभार वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे सरसकट वीज बिल माफी देण्यात यावी. तसेच नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना लागू करावी. बिबट प्रवन क्षेत्रात दिवसा थ्री फेज वीज मिळावी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा. मुलींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करावी. खते औषधे व शेती अवजारे यावरील जीएसटी रद्द करावा.
या निवेदनावर सह्याद्री शेतकरी संघटना, शिवनेरी शेतकरी संघटना, अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT