पुणे

महाविकास आघाडीला भरभरून कौल

CD

योगेश कामथे : सकाळ वृत्तसेवा
खळद, ता. ५ : पुरंदर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल देत सुप्रिया सुळे यांना ३४ हजार ३८७ मतांचे मताधिक्य देत महायुतीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना नाकारले. या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत तालुक्यातील जवळपास ९० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये मताधिक्य दिल्याचे दिसत आहे. पदाधिकारी सोडून गेल्याचा कोणताही परिणाम सुप्रिया सुळे यांच्यावर झाला नाही. उलट त्यांच्या मताधिक्क्यात यावेळी वाढल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पुरंदर तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर राहण्यास पसंती दिली, तर ज्यांच्याकडे सत्तेची पदे नाहीत अशा जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत राहण्यास पसंती दिली होती. हाच मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. यामध्ये महायुतीच्या बाजूने माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, विजय शिवतारे, माजी आमदार संभाजी कुंजीर, अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सभापती बाबा जाधवराव, रेखा चव्हाण, गंगाराम जगदाळे, दत्तात्रेय झुरंगे, दिलीप यादव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक विश्वास जगताप, शांताराम कापरे, जितेंद्र निगडे, नीरा बाजार समितीचे सभापती शरद जगताप, पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य विराज काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती,नीरा बाजार समिती संचालक, सोमेश्वर कारखाना संचालक अशी पदांची मोठी फौज महायुतीच्या बाजूने असताना त्यांना मतदारांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आले व अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गावामध्येच ‘तुतारी’ला पसंती दिली.
महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाकडे आमदार संजय जगताप, सासवड व जेजुरी नगरपालिका, सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, सारिका इंगळे, दत्ता चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती माणिकराव झेंडे, अंजना भोर, गौरी कुंजीर, देविदास कामथे, गिरीश पवार, सुनीता कोलते, बाजार समितीचे संचालक गणेश होले, हनुमंत पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष अभिजित जगताप, आपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय कड, यांच्यासह निवडक पदाधिकारी ताब्यात असतानाही त्यांनी तालुक्यामध्ये जोरदार मुसंडी घेतली.
लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मजबूत मताधिक्य मिळाले. त्याचा काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांना मोठा फायदा होईल, असे वातावरण तरी सध्या पहावयास मिळत आहे. महायुतीच्यावतीने निवडणुकीपूर्वी जाहीर भाषणांमध्ये पुरंदरचा किल्लेदार हे विजय शिवतरे असतील, असे जाहीर केले होते. त्यामुळे यापुढे महायुती व महाविकास आघाडी कायम राहिल्यास संजय जगताप विरुद्ध विजय शिवतरे यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र विधानसभेला पाहावयास मिळेल.

पुरंदर तालुक्यामध्ये शेतीसाठी गुंजवणी पाणी प्रश्न, आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार, प्रशासकीय इमारत हस्तांतर, कऱ्हा नदीलगत संरक्षक भिंत, गावोगावी रस्ते, जल जीवन मिशनअंतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक नळजोडणीसाठी निधी, शेती पंपासाठी वीज कनेक्शन यासारखे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT