पुणे

ड्रोनच्या घिरट्यांमुळे ग्रामस्थांच्या छातीत धडकी

CD

खळद, ता. ६ : खळद (ता. पुरंदर) येथे परिसरात तीन दिवसांपासून रात्री ८ ते १ या कालावधीमध्ये अनेक ड्रोन फिरत आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री आठ वाजले की इकडे ड्रोन आला, तिकडे ड्रोन गेला. त्याची लाइट पांढरी तर दुसऱ्याची रंगीत आहे. यामुळे अज्ञात ड्रोनबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
दौंड, बारामती तर पुरंदर तालुक्यातील काही गावामध्ये ड्रोन फिरत असल्याची माहिती नागरिकांना प्रसार माध्यमातून मिळत असतानाच खळद परिसरातील पोमणनगर, पिंपळे, एखतपूर -मुंजवडी, खानवडी व सभोवतालच्या गावांत तीन दिवसापासून ड्रोन दिसू लागले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना रात्रीचे जागरण करावे लागत आहे.
एकाच वेळी आकाशामध्ये चार ते पाच ड्रोन नागरिकांना वेगवेगळ्या दिशेला दिसत आहेत. याबाबत सासवड पोलिस ठाण्याशी नागरिकांनी संपर्क केला असता त्यांनी हे ड्रोन नसून विमान असल्याची प्राथमिक माहिती नागरिकांना दिली. मात्र नागरिकांचे यावर समाधान झाले नाही. खात्रीपूर्वक ड्रोन असल्याचे पोलिसांना सांगत हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला तर एक दोन वेळा सासवड पोलिस ठाण्याचे अधिकारी गावांमध्ये येऊन त्यांनीही पाहणी केली. मात्र त्यांनी अद्यापपर्यंत हे ड्रोन की विमान याचा अधिकृत खुलासा केला नाही.

दरम्यान, सरपंच भाऊसाहेब कामथे, माजी सरपंच कैलास कामथे, ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, माजी उपसरपंच सुरेश रासकर, ग्रामसेवक महेंद्र लोणकर, पवन कामथे यांनी सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेतली व वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तहसीलदार पुरंदर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


चोरीसाठी टेहाळणी केली जाते की काय?
पुरंदर तालुक्यातील काही भागात ड्रोन गेल्यानंतर चोरीची घटना घडली असल्याची माहिती या भागात नागरिकांमध्ये पसरली असल्याने या ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहेळणी केली जाते की काय? का कोणते सर्वेक्षण सुरू आहे? सर्वेक्षण सुरू असेल तर प्रशासनाला याची माहिती का नाही? ते रात्रीच का येतात, नागरिक दिसल्यावर अचानक लाइट बंद करून गायब का होत आहेत, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT