पुणे

हवाई दलाच्या जवानाचा डेंगीने घेतला बळी

CD

खळद, ता. १० : दिवे (ता. पुरंदर) येथील रहिवासी भारतीय हवाई दलामध्ये स्क्वाड्रन लीडर या वरिष्ठपदावर नागालॅंड येथे कार्यरत असणारे विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे (वय ३६) यांचे आकस्मिक डेंगीच्या आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दिवे या
त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय हवाई दलातील, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, सैनिक उपस्थित होते. त्यांच्याकडून विजयकुमार यांना मानवंदना देत तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, राहुल शेवाळे, दिलीप वाल्हेकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे सभासद यांनी पुष्पचक्र व पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

विजयकुमार यांनी आपली देशसेवा बजावत असताना भारत रशिया युद्ध सरावात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कोरोना काळात इंडोनेशिया येथून ऑक्सिजन आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. विजयकुमार हे सुट्टीवर आले असताना त्यांना डेंगीची लागण झाली. यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे, आई, वडील, पत्नी, भाऊ, बहिण, चुलते असा परिवार आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर झेंडे हे पोलिस खात्यात उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT