पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर हरी नामाचा जयघोष

CD

पळसदेव, ता. ९ ः एकीकडे इंदापूर तालुक्यातील पालखी महामार्गावरून संत तुकाराम महाराज पालखीचा पंढरपूरकडे प्रवास सुरू असल्याने पालखी महामार्ग फुलला आहे. तर दुसरीकडे टाळ-मृदुंगाचा गजरात हरी नामाचा जयघोष करत छोट्या-मोठ्या दिंड्या-पालख्यांमुळे पुणे-सोलापूर महामार्ग सध्या येत आहे. कधी डोक्यावर झाकोळलेल्या आभाळाच्या सावलीचा आधार तर पावसाच्या सरींमुळे गार झालेल्या वातावरणात उचलत्या पावलांनी वारकरी पंढरपूरला निघालेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुणे-सोलापूर महामार्गाला पालखी महामार्गाचे स्वरूप आले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाचा सुमारे ५० किलोमीटर लांबीचा टप्पा इंदापूर तालुक्यात येतो. यामुळे दौंड, कर्जत तालुक्यातील बहुतांश दिंड्या या महामार्गाचा वापर करून पंढरीची वारी पार पाडतात. यामध्ये अनेक दिंड्या डाळज क्र. २ येथून पुढे कळस, शेळगावमार्गे पंढरपूरकडे रवाना होतात. तर काही दिंड्या पळसदेव, लोणीमार्गे थेट इंदापुरातील पालखी मुक्कास्थळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सामील होतात. महामार्गालगतच्या स्थानिक गावांतील दिंड्याही याच महामार्गावरून प्रवास करतात. यामुळे दरवर्षी या महामार्गावरून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी वारी करताना दिसून येतात. महामार्गाच्या बाजूला असलेला प्रशस्त सेवा रस्ता या वारकऱ्यांसाठी मोठा उपयोगाचा ठरत आहे. यामुळे अनेक दिंड्या या महामार्गावरून प्रवास करताना आढळून येत आहे.

महामार्ग पोलिसांची वारकऱ्यांना मदत
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना महामार्ग पोलिसांची मोठी मदत होत आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिस त्यांना काही सूचना देत आहेत. याशिवाय पालखी-दिंडी मुक्काम स्थळी पोचविण्याची जबाबदारी ते पार पाडत आहेत.

महामार्गालगतच्या गावांत मुक्काम
महामार्गावरून जाणाऱ्या पालख्या-दिंड्यांचा मुक्काम लगतच्या गावांमध्ये होत आहे. यामुळे सायंकाळी भजन, कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. यामुळे महामार्गालगतच्या गावांमध्ये सध्या भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत
प्रशासन, आरोग्य यंत्रणा वारकऱ्यांना सेवा पुरवीत आहे.

महामार्गालगत हवी सुविधा
महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी शेकडो मोठ्या झाडांची कत्तल केली. मात्र, नव्याने येथे मोठी झाडे लावण्याची तसदी संबंधित ठेकेदार कंपनीने घेतली असती तर आज येथे मोठी झाडे दिसून आली असती. यामुळे दहा-बारा वर्षांपूर्वी रस्त्यालगतच्या मोठ्या झाडांच्या सावलीत विसावणारे वारकरी आज अशा सावलीपासून पोरके झाल्याचे दिसून येत होते. तर या टप्प्यात ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT