पुणे

बेकायदेशीर कामकाज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

CD

केसनंद, ता. २ : तुकडेबंदी कायदा नियमीत करताना प्रत्येक जिल्ह्यास खरेदीदस्त व सातबारा नोंदीसाठी शासनाने प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिले आहे. खरेदीदस्ताच्या नोंदी सातबारा सदरी करताना संपूर्ण राज्यात व्यक्ती ग्राह्य न धरता प्रमाणभूत क्षेत्रच ग्राह्य धरुन सातबारा सदरी नोंद घेतली जाते. परंतु पूर्व हवेली तालुक्यात मात्र याची अंमल बजावणी होत नसल्याने प्रमाणभूत क्षेत्राच्या सामुहिक खरेदीदस्ताच्या नोंदीचा कायदा पुणे जिल्ह्यात एक सारखाच करावा, तसेच बेकायदेशीर कामकाज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी येत्या १ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशा नाद आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पै.संदीप भोंडवे यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना, भोंडवे म्हणाले, पूर्व हवेलीत अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी प्रमाणभूत क्षेत्र ग्राह्य न धरता व्यक्ती ग्राह्य धरल्याने प्रमाणभूत क्षेत्राच्या सर्व नोंदी थांबविल्या आहेत. तर पूर्व हवेली शेजारच्या पुरंदर, दौंड, खेड व शिरूर तालुक्यात प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्ताच्या नोंदी सातबारा सदरी होत आहेत. मात्र पूर्व हवेलीत मात्र बेकायदेशीर नोंदीचे कारण देत त्या थांबविलेल्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी तृप्ती कोलते संपूर्ण हवेलीच्या तहसीलदार असताना होत्या. त्यावेळी मात्र या नोंदी कायदेशीर ठरवून सातबारा सदरी त्याची नोंद होत होत्या. आता मात्र तशाच नोंदी बेकायदेशीर म्हणून थांबविण्यात आल्या आहेत.’


दरम्यान प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्त नोंदणीचा कायदा सर्वांना सारखाच आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी त्याच नियमाने प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदी दस्ताच्या नोंदी सातबारावर घेत आहेत. मात्र पूर्व हवेलीत अप्पर तहसीलदार सौ. तृप्ती कोलते यांनी मात्र प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्ताच्या नोंदी बेकायदेशीर असल्याचे कारण देत नोंदी थांबवलेल्या आहेत. सौ. तृप्ती कोलते यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या नोंदी बेकायदेशीर असतील तर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी परिपत्रक काढून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अशा प्रकाराच्या नोंदी थांबवून यापूर्वी अशा प्रकारे झालेल्या नोंदी रद्द करून असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या संबंधित सर्कल व तलाठ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
- पै. संदीप भोंडवे, सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT