पुणे

पशुधनाच्या नुकसानीला जबाबदार कोण?

CD

कोरेगाव भीमा, ता. १२ : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथी पशू चिकित्सालयामध्ये लसही उपलब्ध आहे. मात्र, सहा महिन्यांपासून डॉक्टरच नसल्याने लसीकरणाअभावी जनावरे दगावत असल्याने शेतकरी व पशुधनाच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल शेतकऱ्यांसह कोरेगावचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी विचारला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून डॉक्टर न मिळाल्यास ग्रामस्थांसमवेत थेट आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
सहा महिन्यांपूर्वी कोरेगाव भीमा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर अद्यापही राज्य शासनाने येथे पर्यायी डॉक्टर उपलब्ध करून दिलेला नसल्याने याबाबत कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी सहायक आयुक्त नितीन पवार तसेच गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता. मात्र प्रशासनाने अद्यापही डॉक्टर उपलब्ध करून दिलेला नाही. त्यातच दोन महिन्यांपूर्वी लंपी रोगाची लस कोरेगाव भीमाच्या दवाखान्यात येऊनही डॉक्टरअभावी जनावरांना ती दिली गेली नसल्याने लंपी रोगाची लागण होऊन आठवड्यातच दोन जनावरे दगावली.
सरपंच संदीप ढेरंगे यांनी पाहणीबाबतही पाठपुरावा केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त नितीन पवार, पशुधन विकास अधिकारी ऋषीकेश जगताप यांनी लंपीच्या साथीने दगावलेल्या जनावरांची पाहणी केली. यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, यांच्यासह माजी सदस्य अशोककाका गव्हाणे, ग्राहक पंचायतीचे भानुदास सरडे, शेतकरी बाळासाहेब सुपेकर आदींसह शेतकरीही उपस्थित होते.
दरम्यान, पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत शासनाचा ‘स्टे’ असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी देता आला नसल्याचे सांगत शक्य तितक्या लवकर कोरेगाव भीमाला पशुवैद्यकीय अधिकारी देऊन देऊन लसीकरण केले जाईल.
- नितीन पवार, सहायक आयुक्त

कोरेगाव भीमा येथे पशू चिकित्सालयाची सहा महिन्यांपासून डॉक्टरच नसल्याने लसीकरणाअभावी जनावरे दगावल्याने शेतकरी व पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. तातडीने डॉक्टर न मिळाल्यास शेतकरी ग्रामस्थांसमवेत थेट आंदोलन करणार आहे.
- संदीप ढेरंगे, सरपंच, कोरेगाव भीमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT