पुणे

वरवंड, पाटस येथे अतिवृष्टी

CD

केडगाव, ता. ९ ः दौंड तालुक्यात सोमवारी (ता. ८) विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. वरवंड व पाटस येथे अतिवृष्टी झाल्याची माहिती तहसीलदांनी दिली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात मंगळवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

२४ तासांत ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर अतिवृष्टी समजली जाते. सोमवारी वरवंड येथे ७२ तर पाटस येथे ७८ मिलिमीटर (आतापर्यंत एकूण ३९६) पाऊस काही तासांत झाला आहे. यवत येथे ५० (आतापर्यंत एकूण १९३) तर दौंड येथे ४३ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वात कमी पाऊस रावणगाव येथे तीन मिलिमीटर झाला. केडगाव येथे ३५ मिलिमीटर (आतापर्यंत एकूण २७३), देऊळगाव राजे व राहू येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला.
तालुका कृषी अधिकारी राहुल माने व आत्माचे समन्वयक महेश रूपनवर म्हणाले, ‘‘सोमवारी झालेला पाऊस हा ऊस व बाजरी पिकांना गरजेचा होता. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. दौंड तालुक्यात गेल्यावर्षी जून, जुलै महिन्यांत १०४ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा ९ जुलैपर्यंत ३०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यात पूर्ण पावसाळ्यात सरासरी ४५० मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत सरासरी ३०१ मिलिमीटर पाऊस झाला असून तालुक्यात सोमवारी सरासरी ३७.६ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील शरद सोनवणे यांनी दिली.

‘पंचनाम्यांचे अहवाल सादर करा’
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. असे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT