पुणे

यांत्रिकपद्धतीने भात लागवडीसाठी दहा एकरवर बीज प्रक्रिया

CD

कोळवण, ता. ८ : कोळवण (ता.मुळशी) येथील जय किसान राइस मिलचे व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव कृष्णा दुडे यांच्या दहा एकर क्षेत्रावर भात लागवडीसाठी बीज प्रक्रिया प्रयोग करण्यात आला. कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.


कोळवण खोऱ्यात भालगुडी, कोळवण व चिखलगावमध्ये तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार, कृषी सहायक शेखर विरणक यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत भालगुडीत सहा एकर, कोळवणला दहा एकरवर चिखलगाव येथे नऊ एकर असे मिळून पंचवीस एकर क्षेत्रावर तालुका कृषी विभाग या वर्षी भाताची लागवड यांत्रिकीकरण (मशीनद्वारे भात लागवड)प्रकल्प राबविणार आहे

अशी केली प्रक्रिया
- भात बियाणे हे मिठाच्या पाण्याच्या द्रावणातून काढले
-स्वच्छ पाण्यातून दोन वेळा धुवून सावलीत वाळवले
- रासायनिक बीजप्रक्रिया प्रतिकिलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम या बुरशीनाशक लावले.
- जैविक प्रक्रिया करताना बियाण्यास २५० ग्रॅम एझोटोबॅक्टर आणि पीएसबीची बीजप्रक्रिया केली
- खत आणि माती मिश्रित प्लास्टिक ट्रेमध्ये पेरणी केली.

हेक्टरी उत्पादनात दहा टनांनी वाढ
साधारण एकवीस दिवसानंतर ट्रेमधील भात रोपे मशिनद्वारे लागवडीसाठी तयार होणार आहेत. पारंपरिक भात लागवडीचे उत्पादन हे हेक्टरी पस्तीस टन मिळते तर मशिनद्वारे भात लागवड केल्यास उत्पादन हेक्टरी दहा टनांची वाढ होते. शिवाय मजुरीवर होणारा खर्चही वाचतो. औषधे फवारणीवरील खर्च वाचतो.

यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केल्यास भात रोपांची लागवड अवघ्या एकवीस दिवसांत होते. यामुळे भात रोपांना वाढीस जास्तीचा वेळ मिळतो व भात रोपांना फुटवे जास्त फुटतात. परिणामी भात उत्पादन वाढतेच शिवाय मजूरीवरील खर्च वाचतो. यामुळे जास्तीत जास्त शेतकर्ऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्याद्वारे होणाऱ्या भात लागवडीकडे वळावे.
- हनुमंत खाडे, तालुका कृषी अधिकारी, मुळशी


यांत्रिकीकरणाच्या भात लागवडीचा प्रयोग प्रथम मागील वर्षी थोडक्यात केला होता. त्यामुळे उत्पादन वाढते असे लक्षात आल्यावर आता यावर्षी दहा एकर क्षेत्रावर मशिनद्वारे भात लागवड करणार आहे.
- महदेव दुडे, संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

01018

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT