पुणे

बारामती कुस्ती केंद्राच्या अभिषेक भिसे याची राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड

CD

काटेवाडी, ता. १२ : बारामती कुस्ती केंद्राचा खेळाडू अभिषेक भिसे याची काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मोरोची (ता. माळशिरस) येथील सर्वसामान्य कुटुंबातील बारा वर्षीय अभिषेक याची कमी वयातच राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अभिषेकचे गुरू वस्ताद सदाशिव कोडलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती कुस्ती केंद्राचा एवढ्या कमी वयाचा राष्ट्रीय पातळीवर निवड झालेला अभिषेक हा पहिलाच खेळाडू आहे. यापूर्वी त्याने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. अभिषेक हा सध्या बारामती येथील छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे. सध्या त्याच्या खुराकाचा व खेळाचा खर्च आम्ही आमच्या पातळीवर करत आहोत. आता सुद्धा अभिषेक याला काश्मीरला पाठवण्यासाठी मदतीची गरज आहे. अभिषेकचे वडील पेंटर म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांची कमाई तोकडी आहे.
दरम्यान, अभिषेकचे वडील आनंदराव भिसे म्हणाले, ‘‘माझी एक एकर शेती आणि मी पेंटर म्हणून व्यवसाय करतो. पण त्यातून कमाई फारच कमी आहे. लहानपणापासूनच मला स्वतःला कुस्तीची खूप आवड होती. माझा मुलगा सातव्या महिन्यामध्ये जन्मला. अकाली प्रसुतीमुळे सुमारे दीड महिना तो रुग्णालयामध्येच होता. या वेळी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मुलाकडे विशेष लक्ष द्या त्याचे वजन वाढले पाहिजे, अशा सूचना दिल्या होत्या. मी त्या अगदी मनावर घेतल्या व त्याचवेळी ठरवले की मी मुलाला पैलवान करणार. माझी आर्थिक परिस्थिती नसताना बारामती कुस्ती केंद्रातील प्रशिक्षक व त्याचे वस्ताद कोडलकर यांनी आम्हाला खूप मदत केली. तसेच शाळेच्या शिक्षकांनी व पदाधिकाऱ्यांनी देखील त्याला नेहमी पाठिंबा दिला. आज माझा मुलगा राष्ट्रीय पातळीवर खेळतोय हे पाहून मला आनंद होतो. तो चांगला नावाजलेला पैलवान व्हावा यासाठी मीही जमेल तशी माझ्या परीने जबाबदारी उचलणार आहे.’’

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून अभिषेकचे कौतुक...
अभिषेकची काश्मीर येथील राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर छत्रपती शाहू हायस्कूलच्या शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिषेकसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी पवार यांनी अभिषेकचे कौतुक केले. ‘‘तू राष्ट्रीय स्पर्धा खेळून ये त्याच्यामध्ये जिंकलास अथवा हरलास तरी हरकत नाही. पुढचे मी पाहतो.’’ असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अभिषेकला दिला. अशी माहिती अभिषेक चे वडिलांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; देशांतर्गत शेअर बाजार कसा असेल?

Maharashtra Politics: निवडणुकीनंतर होणार प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ; सातवड यात्रेतील होईकाची भविष्यवाणी नेमकी काय?

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' बंद केली, शेतकरी सन्मान, पीएम आवासही थांबणार आहे का? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Latest Maharashtra News Updates : कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT