पुणे

‘इलेक्ट्रॉनिक’ पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तोडकर

CD

मंचर, ता. १८ : पुणे जिल्हा पत्रकार संघ व आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाशी संलग्न असणाऱ्या आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सचिन तोडकर व उपाध्यक्षपदी पत्रकार साईदीप ढोबळे यांची निवड करण्यात आली.
डिंभे (ता.आंबेगाव) येथील विश्राम गृहात पत्रकारांची बैठक पार पडली. खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील व तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांच्या हस्ते तोडकर व ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार डी.के.वळसे पाटील, आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील, उपाध्यक्ष नीलेश कान्नव, सचिव चंद्रकांत घोडेकर, विश्वस्त कुमार होनराव, विलास शेटे, सुदाम बिडकर, जयेश शहा, अविनाश गुंजाळ आदी उपस्थित होते. शिवाजीनगर,-पुणे येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकारी मेळाव्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी तोडकर यांचा सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT