पुणे

‘लाडकी बहीण’साठी शरद बँकेत १०० रुपयांत खाते

CD

मंचर, ता.९ : येथील शरद सहकारी बँकेने राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ महिलांना मिळण्यासाठी नवीन बचत खाते फक्त शंभर रुपयात उघडण्याची सुविधा बँकेच्या पुणे जिल्हा पुणे शहर, भोसरी, मुंबई उपनगर औरंगाबाद व संगमनेर आशा एकूण २७ शाखांमध्ये उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

शहा म्हणाले की, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त भगिनींना मिळावा, या उद्देशाने सर्वत्र जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व बँकेचे अधिकारी व कर्मचारी गावोगावी सध्या जनजागृतीचे काम करत आहेत.२१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार ५०० रुपये मिळणार आहेत. सदर रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे बँकेत महिलांची खाती उघडण्यासाठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर बँकेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्ये देखील सरकारच्या योजनेची रक्कम जमा करून लाभ घेता येईल. यापूर्वीही शासनाचे विविध योजनांच्या सवलतीचा लाभ मिळण्यासाठी बँकेने खातेदारांना सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी व खाते उघडण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. तातडीने खाते उडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड व दोन फोटो आवश्यक असणार आहेत, असे शरद बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT