महुडे, ता. ३१ : भोलावडे (ता.भोर) येथील सूर्यकांत बाबूराव काळे व चंद्रकांत बाबूराव काळे या प्रगतशील शेतकरी बंधूंनी एसआरटी या अत्याधुनिक तंत्राच्या जोरावर तीस गुंठ्यांमध्ये वेलवर्गीय कारले पिकाची शेती साकारली आहे. आतापर्यंत १२ तोडे झाले असून, दर तोड्यास सरासरी १२० किलो फळे मिळाली आहेत. त्यास प्रतिकिलो सुमारे ४० रुपये बाजारभाव मिळत आहे. चांगले उत्पादन मिळू लागल्याने काळे कुटुंबांसाठी कारले ते गोड ठरले आहे.
कामथडी (ता .भोर) येथील मिडोरीलाँग वाणाची तीन हजार आठशे रोपे आणली. रोपांची लागण करण्यापूर्वी गांडुळ खतांचा २५ गोणीचा बेसल डोस दिला. तयार गादी वाफ्यावर दोन ओळीत पाच फूट व दोन वेलीत दोन फूट अंतर ठेवून ऑक्टोबरमधील दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात दोन टप्प्यांत लागवड केली.
असे केले कीड नियंत्रण
* गो कृपा अमृतचा ५०० लिटरचा डोस
* रोपे लावल्यानंतर दर चार दिवसांनी गोकृपा अमृत, देशी गाईचे गोमुत्राची फवारणी
* आठ दिवसांनी दशपर्णी अर्काची फवारणी
* दर चार दिवसांनी ठिबकद्वारे मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, बोरान, इसाबेन
कारल्याचे फायदे
* कर्बोदके,
* प्रथिने,
* खनिजे
* अ आणि क जीवनसत्त्व
* लोह, मॅग्नेशिअम
तारकाठीच्या मंडपाने उत्पादनात वाढ
कारली हे वेलवर्गीय पीक असल्याने जमिनीवरच वेल पसरल्यास मर्यादित फुटवे येतात. त्यांचा परिणाम फळ उत्पादनावर होतो. वेलींना आधार दिल्याने वाढ चांगली होऊन नवीन फुटवे येऊन फळधारणा चांगली होत आहे. तारकाठीच्या मंडपाने फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर वाढत असल्याने वेल,पाने, फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ती सडत नाहीत. कीड व रोगांचे प्रमाण कमी झाले. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहण्यास मदत झाली.
फळांचा रंग चमकदार गडद हिरवा व टोकाकडे फिकट असून आकार आणि आवरणाचा खरबडीतपणामुळे कारल्याला मागणी जास्त आहे. सासवड शेवाळवाडी येथील बाजारामध्ये घाऊक विक्री केली जाते. कारल्याच्या उच्च प्रतीमुळे चांगला बाजारभाव मिळत आहे. जानेवारी महिन्यांपर्यंत सात तोडे होण्याची अपेक्षा आहे.
- सूर्यकांत काळे, प्रगतशील शेतकरी, भोलावडे, ता.भोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.