पुणे

आपापल्या उमेदवारासाठी भोर तालुक्यामध्ये पैजा

CD

भोर तालुक्यात मताधिक्य मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कमालीची रस्सीखेच पाहायला मिळाली. हेवेदावे, आरोप प्रत्यारोप झाले‌. घड्याळ व तुतारी चिन्हासाठी जास्तीत जास्त मतदान कसे पडेल याकडे लक्ष केंद्रित केले होते. आता आपणाच उमेदवार विजयी होणार अशी खात्री असल्याने यासाठी पैजा लागल्या आहेत.
-विलास मादगुडे, महुडे


लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली आहे. थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी काट्याची टक्कर निवडणूक झाली आहे. यासाठी कारी उत्रौलीत गटात वीसगाव खोरे, आंबवडे खोरे तसेच हिरडस मावळातील गावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे तर राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे धुरा सांभाळत होते.

भोर तालुक्यात १० ते १५ हजारांपर्यंत सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळण्याची अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे. परंतु एमआयडीसी विषयावर परिवर्तनाची गरज असल्याच्या मुद्यावर तरुणांनी केलेले मतदान‌ महत्त्वाचे ठरणार असल्याने मताधिक्य कोण घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर कुलदीप कोंडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सुनेत्रा पवार यांना फायदा होणार आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी सुरुवातीपासून आघाडीचा धर्म पाळत सुप्रिया सुळे यांचे काम केले. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांना मानणारा व काँग्रेसचा मतदार, शरद पवार यांना मानणारा मतदार तसेच उद्धव ठाकरे यांना मानणारा मतदार ही सुप्रिया सुळे यांची जमेची बाजू आहे तर अजित पवार यांना मानणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार, अजित पवार‌ व‌ उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विकास व‌ एमआयडीसी बद्दलची दिलेली आश्वासने, भाजप व शिवसेना पक्षाने‌ केलेला‌ प्रचार‌ हा जमेची बाजू आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रचार
आघाडीकडून स्वाभिमान, पक्षफुटी व मोदी विरोधात‌ महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रचार करण्यात आला. गावागावातून तरुणांना कामधंदा व नोकरीसाठी करावे लागणारे स्थलांतर, अजित पवार बोलतात‌ ते करतात त्यामुळे त्यांनी दिलेल्या एमआयडीसी मुद्यावरील मतदान महत्त्वाचे आहे.

-एमआयडीसी मुद्यावर तरुणांनी केलेले मतदान तालुक्यात निर्णायक
- राष्ट्रवादीकडून विकास कामे, रोजगार, पाणी प्रश्नांना प्राधान्य
- मताधिक्य कोण घेईल हे यावर तालुक्यातील मतदारांचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT