पुणे

जनावरांनाही बसतायेत टंचाईच्या तीव्र झळा

CD

महुडे, ता. १४ : भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे क्षेत्रालगतच्या गावांना पाणी समस्या जाणवू लागली असून टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

धरणाचा पाणी साठा लवकर खालावला असून‌ धरणांमध्ये फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे या भागातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात असलेल्या विहिरींनीही तळ गाठल्यामुळे हिरडस मावळातील गावांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भोर तालुक्यात सध्या पंचायत समिती मार्फत बारा गावे व वाड्या वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे तर चार गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी आहेत.
दरम्यान, टँकर सुरू असलेल्या बारा गावांमध्ये १८२१ गाई-म्हशी तर ५४३ शेळी - मेंढ्यांची संख्या आहे.

गाव निहाय जनावरांची संख्या
करंदी खे.बा- (गाई म्हशी ६३७, शेळी मेंढी १६३), नानावळे-शिंदेवस्ती (गाई म्हशी १००), पऱ्हर बु. मधील कचरे वस्ती, उब्रांटकर वस्ती-(गाई म्हशी ५९,शेळी मेंढी १५), अंशिपी- उबार्डे (गाई म्हशी ३९), शिळींब -राजवडी(गाई म्हशी ६६,शेळी मेंढी २४), मोरवाडी-पाचलिंग (गाई म्हशी १२०, शेळी मेंढी ४५), शिंदेवाडी (गाई म्हशी २५२, शेळी मेंढी १५६), ससेवाडी (गाई म्हशी ३४०,शेळी मेंढी ३८), वारवंड(गाई म्हशी ५१), वरोडी खुर्द (गाई म्हशी २३०,शेळी मेंढी ४५), वरोडी डायमुख (गाई म्हशी १८०, शेळी मेंढी ३०), जयतपाड हुंबेवस्ती (गाई म्हशी४३, शेळी मेंढी २७) एकूण गाई म्हशी १८२१ आणि शेळी मेंढी ५४३ संख्या आहे. तसेच पंचायत समितीकडे शिरगाव, कुडली खुर्द, शिरवली हि.मा.,धानिवली ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिले आहेत.

धरणात चार पटीने पाणीसाठा कमी
नीरा देवघर धरणात सध्या आठ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी धरणात ३७ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार पट पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाई सुरू झाली आहे. टँकरची मागणी वाढली आहे. धरणात अत्यंत कमी पाणीसाठा राहिल्याने धरणात असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या विहिरींच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या वारवंड, कारूंगण, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, शिरवली, पऱ्हर, हिर्डोशी, कोंढरी, वेनुपुरी पाण्याची टंचाई भेडसावत आहे.

00704

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT