पुणे

नारायणगाव येथे दोन महिलांवर जीवघेणा हल्ला

CD

नारायणगाव, ता. ७ : पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचा मनात राग धरून तरुणाने कोल्हे मळा येथील दोन महिलांवर शनिवारी दुपारी लाकडी दांडके व चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
प्रशांत जालिंदर मुळे (वय ३२, रा. निरामय सोसायटी, कोल्हे मळा, नारायणगाव) याने केलेल्या हल्ल्यात दीपाली संजय गाडेकर (वय २७ रा. निरामय सोसायटी, कोल्हेमळा) व शैला ऊर्फ भारती विजय थोरात (वय ३२, रा. साकार नगरी, नारायणगाव ) या महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शनिवारी रात्री प्रशांत मुळे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी: आरोपी प्रशांत मुळे व फिर्यादी दीपाली गाडेकर हे कोल्हेमळा येथील निरामय सोसायटीत राहतात. पूर्वी झालेल्या भांडणातून दीपाली गाडेकर यांनी आरोपी प्रशांत मुळे यांच्या विरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. आपल्या विरोधात पोलिस ठाण्याला तक्रार दिली आहे. याचा राग प्रशांत मुळे यांच्या मनात होता.
दरम्यान, आरोपी प्रशांत मुळे हा घटनास्थळी आला. त्याने लाकडी दांडक्याने शैला ऊर्फ भारती थोरात यांच्यावर हल्ला केला. यामध्ये शैला यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर आरोपीने दीपाली गाडेकर यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी दिपाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुळे याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही.धुर्वे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT