पुणे

‘प्रहार’च्या भोर तालुकाध्यक्षावर खंडणी, अपहरणप्रकरणात अटक

CD

नसरापूर, ता. ६ : हातवे बुद्रुक (ता. भोर) येथील तरुण बेपत्ता असल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांच्यावर खंडणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, राजगड पोलिसांनी त्यांना अटक करून शनिवारी (ता. ६) भोर न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
हातवे बुद्रुक (ता. भोर) येथून कृष्णात राजेंद्र पालखे (वय ३०) हा तरुण ३१ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबत त्याचे वडील राजेंद्र लक्ष्मण पालखे यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये सप्टेंबर २०२३ पासून ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहीते यांनी कृष्णात यास, तू अवैध प्रवासी वाहतूक करतोस, अशी अवैध वाहतूक करायची असेल तर मला पैसे द्यावे लागतील?’ असे म्हणून तगादा लावून १० हजार रुपये खंडणी म्हणून घेतली. तसेच, हातवे गावामधील बचत गटाच्या जयश्री गोरक्ष थिटे यांच्या सांगण्यावरून मोहीते यांनी राजेंद्र पालखे यांना त्यांच्या किकवी येथील प्रहार जनशक्ती कार्यालयात बोलावून मोहीते व थिटे यांनी धमकावून बचत गटाच्या व्यवहारापोटी तडजोड करतो, असे सांगून त्यासाठी देखिल पैशाची मागणी केली व त्यांना पैसे देत नाही, असे समजल्यावर त्यांनी कृष्णात यास पैशासाठी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
राजगड पोलिसांनी याबाबत मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, जयश्री थिटे यांच्यावर शिवीगाळ करून दमदाटी करणे, असा गुन्हा दाखल केला आहे. थिटे यांचा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT