पुणे

चांडोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात थोरांदळे येथील पती-पत्‍नी जखमी

CD

निरगुडसर, ता. ८ : चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथे दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीवर बिबट्याने मंगळवारी (ता. ७) सायंकाळी झडप मारली. दुचाकीला बसलेल्या धडकेमुळे ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. यावेळी गाडीच्या झालेल्या मोठा आवाजामुळे बिबट्या पळून गेला. मात्र पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील पोपट वाबळे (वय ३०), व त्यांची पत्नी नमिता (वय २६) हे मंचर येथे नोकरी करतात. कामावरून सुटल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ते घरी परतत असताना चांडोली खुर्द गावच्या हद्दीत सायंकाळी बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली पण बिबट्याचा नेम चुकल्याने बिबट्याची धडक दुचाकीला बसली. यामुळे पती पत्नी दुचाकीसह रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडल्याने ते जखमी झाले. नमिता वाबळे यांच्या डोक्याला जखम झाली आहे. तर पोपट वाबळे यांच्या पायाला, हाताला जखमा झाल्या आहेत. यावेळी गणेश अभंग व काही स्थानिक नागरिकांनी त्यांना मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांनी रुग्णालयात वाबळे पती-पत्नीची भेट घेऊन विचारपूस केली व हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT