पुणे

केंद्र सरकार लोकप्रतिनिधींना डावलतंय

CD

नीरा नरसिंहपूर, ता. ६ : ‘‘केंद्र सरकार स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलत असून, प्रोटोकॉल पाळत नाही. जलजीवन योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात स्थानिक आमदार व खासदार यांना कार्यक्रमाचे आमंत्रणच दिले गेले नाही,’’ असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात गावभेट दौऱ्यानिमित्त खासदार सुळे या बोलत होते. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, प्रशांत पाटील, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, सचिन सपकाळ, सागर मिसाळ, सुरेश शिंदे, दादासाहेब क्षिरसागर, श्रीकांत बोडके, नरहरी काळे, सरपंच अश्विनी सरवदे, उपसरपंच रोहिणी काकडे, अर्चना सरवदे, भाग्यश्री दुनाखे, संग्रामसिंह पाटील, रेहाना मुलाणी, विठ्ठल देशमुख, चंद्रकांत सरवदे, जगदीश सुतार, शंकर राऊत आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला असून, त्याचे श्रेय कोणी घेण्याचे प्रयत्न करू नये. आमदार दत्तात्रेय भरणे, तत्कालीन पालकमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सदर आराखडा मंजूर केला.’’
आमदार भरणे म्हणाले,‘‘तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा आराखडा मी बनवला असून, मंजुरीस देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची मदत केली. सदर आराखडा मंजुरीस काही लोकांचा अधिकार व संबंध नसताना जाहिरातबाजी करत कोनशिलेवर नावे टाकली जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे व आमदार म्हणून मी महाविकास आघाडी सरकारने आराखड्यास मंजुरी दिली आहे. मात्र, आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात काही लोक सक्रिय झाले आहेत.’’
धनंजय दुनाखे यांनी प्रास्ताविक; तर गौरव दंडवते यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत सरवदे यांनी आभार मानले. दशरथ राऊत, अरुण क्षीरसागर आदी उपस्थित होते.

महागाई गगनाला भिडली असून, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र, केंद्र सरकार यावर गप्पा का आहे?
- सुप्रिया सुळे, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT