पुणे

सराटी येथील नीरा नदीच्या पुलावरील खड्डे बुजविले

CD

नीरा नरसिंहपूर, ता. ५ ः ‘सराटी येथील नीरा नदीवरील पुलावर मोठे खड्डे’ हे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेऊन खड्डे बुजविल्याने प्रवासी, वारकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर नीरा नदीवर असणारे सराटी येथील पुलावर मोठे खड्डे पडल्याने सतत अपघात होऊन नागरिकांना त्रास होत आहे. इंदापूर व अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादात खड्डे न बुझवल्यास पालखीतील वाहने व वारकऱ्यांना याचा सामना करावा लागणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल तातडीने घेऊन पुलावरील खड्डे बुजविले.

संत तुकाराम महाराज पालखी १० जुलैला इंदापूर मुक्कामी असून ११ जुलैला इंदापूर-अकलूज मार्गाने सकाळी मार्गस्थ होऊन वडापुरी, बावडा येथील दुपारचा विसावा करून पुणे जिल्ह्यातील शेवटचा सराटी मुक्कामी येणार आहे. तसेच १२ जुलैला सराटी येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा नीरा नदीतील पादुका स्नान आटोपून सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे नीरा नदीवरील पुलावरून जाणार आहे. पुलावरील खड्डे बुजवल्याने वारकरी, भाविक व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
NPR24B04153

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT