पुणे

वडगाव कांदळीतील २६५ वर्षांपूर्वीचे शिलालेख

CD

पिंपळवंडी, ता. ७ : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील दोन शिलालेख नुकतेच उजेडात आले. सुमारे २६५ वर्षांपूर्वी कोरलेल्या या शिलालेखाचा अर्थ समोर आल्याने या ऐतिहासिक गावातील वेशीचे आणि मंदिराचे महत्व अधोरेखित झाले आहे.
पुणे येथील शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांनी या शिलालेखांचे वाचन केले. शिलालेख उजेडात आणण्यासाठी त्यांना दामोदर मगदूम, ज्ञानेश्वर पाचपुते, सिद्धार्थ कसबे, विशाल सावंत, विनोद रायकर, फयाज जमादार यांनी सहकार्य केले.

गाववेशीवरील शिलालेख
या शिलालेखांतील एक वडगाव कांदळीच्या पूर्वाभिमुख असलेल्या एकमेव गाववेशीवर होता. मात्र, सन २००३च्या दरम्यान वेशीचा जिर्णोद्धार करताना तो बाजूला काढून ठेवला होता. सध्या हा शिलालेख मारुती मंदिराच्या पुढे एका ओट्यावर बसवला आहे. हा शिलालेख उठाव स्वरूपातील ६ ओळीचा असून, शुद्ध मराठी भाषेत आहे. काळाच्या ओघात वातावरणामुळे, तसेच रंगरंगोटी केल्यामुळे शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून, पुसट झालेली आहेत, तर काही अक्षरे तुटून गहाळ झालेली आहेत. शिलालेखावर सूर्य आणि चंद्र ठळकपणे कोरलेले आहेत.

शिलालेखाचे वाचन
१) श्री मारुती प्रसन्न: कारगीर
२) राजेश्री सकोजी पाटी; लच
३) ल पा. कावजी पाटील
४) मो. यांनी बांधली वेंस
५) सके १६८२ वी. काम रुपये ५०० पा
६) नाम सवच्छरे चैत्र पो. चसे.

अर्थ : शालिवाहन शकाच्या १६८२ व्या वर्षी विक्रम नाम संवत्सरात चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच (३१ मार्च १७६० सोमवार) या दिवशी मौजे वडगाव कांदळी येथील मारुती चरणी तत्पर असलेले राजेश्री सकोजी पाटील पाचपुते व गावचे मोकदम पाटील कावजी पाटील पाचपुते यांनी मारुती मंदिरासमोर गावची वेस बांधली. या वेशीच्या बांधकामासाठी एकूण ५०० रुपये खर्च आला आहे. येथे ज्या कारागिरांनी काम पूर्ण केले, त्यांचे नाव शिलालेखात आहे पण अक्षरे तुटल्यामुळे ते वाचता येत नाहीत.

शिलालेखाचे महत्त्व
या शिलालेखाची सुरुवात श्री मारुती प्रसन्न अशी स्तुतीने झाली आहे. शिलालेखाची शिळा अनेक वर्षे उघड्यावर असल्यामुळे त्याची अक्षरे खराब झाली आहेत. सदर शिलालेखावरील अक्षरे देखील सुबक असून, एकसारखीच नाहीत. जागेअभावी काही ठिकाणी अक्षराचे संक्षिप्त रूप दिलेली आहेत. शिलालेखात असलेले राजेश्री सकोजी पाटील, कावजी पाटील पाचपुते हे गावचे मोकदम पाटील आहेत. गावाच्या राज्यकारभाराचा गाडा चालवणारे पद म्हणजे पाटील होय. पाचपुते पाटील यांनी गावाच्या लोकांच्या संरक्षणदृष्ट्या गावाची बेस बांधणे हे सामाजिक, महत्तम कार्य आहे. यावरून हे पाचपुते घराणे हे सामाजिक क्षेत्रात एक अग्रगण्य कार्य करणारे व्यक्तिमत्त्व होते, हे सिद्ध होते. याच बरोबर त्या वेशीच्या बांधकामाकरिता ५०० रुपये खर्च करून त्या काळातील आर्थिक व्यवहाराचीही माहिती मिळते.

महादेव मंदिर शिलालेख
दुसरा शिलालेख वडगाव कांदळी या गावातील मारुती मंदिरासमोर असलेल्या महादेव मंदिरावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बसवलेला आहे. हा शिलालेख उठाव स्वरूपाचा असून, ३ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे. काळाच्या ओघात वातावरणामुळे, तसेच रंगरंगोटी केल्यामुळे शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून, पुसट झालेली आहेत. शिलालेखाची दुसरी ओळ पूर्ण खराब झाली असून, अक्षरे नीट लागत नाहीत.

शिलालेखाचे वाचन
१. श्री महादेव. पा (प्रसन्न) हे देऊळ xxx
2. २.Xxx लक्ष्मण मवजे का. (कांदली)
३. सके १७६६ क्रोधी नाम वैशाख वद्य १०.

अर्थ : शालिवाहन शकाच्या १७६६ क्रोधीनाम संवत्सरात वैशाख
वद्य १० या दिवशी म्हणजेच (११ मे १८४४ शनिवार) या दिवशी मौजे वडगाव कांदळी येथील श्री महादेव चरणी तत्पर असलेले लक्ष्मण (आडनाव तुटले आहे) यांनी महादेव मंदिर बांधले.

शिलालेखाचे महत्व : शिलालेखाची सुरुवात श्री महादेव प्रसन्न अशी स्तुतीने झाली आहे. शिलालेखाची शिळा अनेक वर्ष उघड्यावर, तसेच रंगरंगोटी केल्यामुळे त्याची अक्षरे खराब झाली आहेत. शिलालेखावरील अक्षरे सुबक असून, एकसारखीच आहेत. शिलालेखात असलेले लक्ष्मण आडनाव मिळत नाही. त्यांनी ब्रिटिश काळात महादेवाचे मंदिर बांधले. त्यावरून त्यांची धार्मिक वृत्ती दिसून येते. याच बरोबर मंदिर बांधणे हे सामाजिक, महत्तम कार्य आहे. यावरून हे एक सामाजिक क्षेत्रात एक अग्रगण्य कार्य करणारे व्यक्तिमत्त्व होते सिद्ध होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT