पुणे

किस्से निवडणुकीचे

CD

किस्से निवडणुकीचे

शरद पवारांची इतकी मोठी रॅली
तर मी का सभेला आलोय !

लो कसभेच्या १९८४ मधील निवडणुकीवेळी पिंपरी-चिंचवड शहराचा बहुतांश भाग बारामती लोकसभा मतदारसंघात होता. बारामतीमधून एस कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते शरद पवार व कॉंग्रेस आयकडून शंकरराव बाजीराव पाटील रिंगणात होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेसचे उमेदवार पाटील यांच्या प्रचार सभेसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची सभा फिनोलेक्स कंपनीच्या मैदानावर (राजर्षी शाहू महाराज पुतळ्या पाठीमागे) आयोजित केली होती. त्याच दिवशी शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधून भव्य रॅलीचे नियोजन केले होते. त्यावेळीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी ऐनवेळी गरज लागल्यास व इंग्रजी भाषेची अडचण झाल्यास व्यासपीठावर दुभाषिक म्हणून एका स्थानिक पत्रकाराची नेमणूक केली होती. राजीव गांधी हेलिकॅप्टरने टेल्को (टाटा मोटर्स) कंपनीच्या हेलिपॅडवर आले व तेथून मोटारीने सभेच्या ठिकाणी आले. व्यासपीठावर आल्यावर त्यांनी हिंदीतून विचारले ‘शहरात येताना मी हेलिकॉप्टरमधून रॅली पाहिली. ती रॅली आपल्याच सभेला येत आहे का?’ त्यावर उपस्थित एका नेत्याने ‘नाही सर ती शरद पवार यांची रॅली आहे,’ , असे सांगितले. त्यावर राजीव गांधी म्हणाले की, ‘जर शरद पवार इतकी मोठी रॅली काढत असतील तर मी येथे आपल्या उमेदवाराच्या सभेला कशाला आलो आहे? हा तर वेळेचा दुरुपयोग आहे.’ राजीव गांधी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत अप्रत्यक्षपणे शरद पवार निवडून येणार, अशीच कबुली दिली होती. राजीव गांधी यांच्या वक्तव्यातून विरोधकांबद्दलच्या मनाच्या मोठेपणाच्या वक्तव्याने व्यासपीठावरील नेत्यांना आश्‍चर्य वाटले. ते एकमेकांकडे पाहू लागले. हा किस्सा आजच्या काळातही चर्चिला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT