पुणे

बालवीर युवक मंडळाने साकारले महालक्ष्मीचे मंदिर

CD

पिरंगुट, ता. २१ : पिरंगुट (ता.मुळशी) येथील कॅंप भागातील बालवीर युवक मंडळाने गणेशमूर्तीला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रतिकृतीचा देखाव्याची आकर्षक सजावट केली आहे. मंडळाने यावर्षीही सामाजिक उपक्रम व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला आहे.
अध्यक्ष रामदास गणपत पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविलेले आहेत. मंडळाचे प्रतिनिधी व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार पवळे यांनी सांगितले की, मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, शालेय गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व आर्थिक मदत, सार्वजनिक कामात पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, रस्ते अपघातावेळी तातडीची धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत आदी उपक्रमाबरोबरच इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा सन्मान आदी उपक्रम सातत्याने राबविले जातात. सामाजिक प्रबोधनासाठी तसेच व्यसनमुक्तीसाठी कीर्तन सोहळा आयोजित केला. गुलालविरहित मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढली जाते. यावर्षीही सजावटीला अनावश्यक खर्च न करता तोच खर्च सामाजिक व अन्य विधायक उपक्रमांना वापरणार आहोत.

02462

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना प्रवेशानंतर जयश्री जाधवांचं सतेज पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, 'त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही'

Pune Fire: पुण्यात पार्किंगवरुन वाद; माजी सैनिकाने झाडली गोळी; नेमकं काय घडलं?

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

SCROLL FOR NEXT