पुणे

मुळशी तालुक्यात ३७१ लोखंडी होर्डिंग

CD

पिरंगुट, ता. १४ : मुळशी तालुक्यात उभे केलेली लोखंडी होर्डिंग विनापरवानगीचे उभे केलेले असून प्रशासनाकडील आकडेवारीनुसार तालुक्यातील एकूण ३७१ अशी होर्डिंगची संख्या आहे. ही आकडेवारीही पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून मागवून घेतली असून ती आकडेवारीही लपवालपवीची आणि अपुरी आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींनी अचूक आकडेवारी न देता त्यात काहीशी लपवाछपवी केली आहे. इतकेच काय या आकडेवारीत कोळवण खोऱ्याकडील करमोळी, चाले तसेच कोळवणपर्यंतच्या होर्डींगची आकडेवारीच नाही. मुठा आणि मोसे खोऱ्यातीलही आकडेवारी उपलब्ध नाही.

मुळशी पंचायत समिती कार्यालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, गट विकास अधिकारी यांचे मार्फत स्ट्रक्चरल इंजिनिअरने प्रमाणित केलेला दाखला सादर केल्यानंतरच होर्डिंग उभारण्यासाठी संबंधितांना परवानगी देण्यात येते. त्याअनुषंगाने हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व नजीकच्या मान्सूनच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित मालमत्ता हानी व वाहतुकीस अडथळा होऊ नये, याकरिता परवानगी दिलेल्या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा नव्याने करून घेण्यास संबंधित होर्डींगधारकास कळवून त्याप्रमाणे ऑडिट केल्याचा दाखला १५ दिवसात सादर करण्याविषयी सूचित करावे.

होर्डिंगधारकांना नोटिसा
पुणे ग्रामीण हद्दीतील स्ट्रक्चरल ऑडिट न केलेली सर्व होर्डिंग अनधिकृत समजून संबंधित ग्रामपंचायत यांनी संबंधित होडींगधारकास नोटीस देऊन तत्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी. तसेच सर्व अनधिकृत होर्डिंगवर सक्त कारवाई करण्यात यावी. त्यामध्ये प्रामुख्याने धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी.

जीवित हानी टाळा
मुळशीत सार्वजनिक जागांवर, रस्त्यांवर जाहिरात होर्डिंग मोठ्या प्रमाणावर उभारलेले आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. परंतु त्यामुळे सगळ्यात जास्त अनधिकृत होर्डिंग उभे राहत आहेत आणि ह्या अनधिकृत होर्डिंग मुळे मुळे पाऊस, वारा, वादळाच्या दरम्यान लोकांची जीवित हानी वाढलेली आहे. म्हणून
तालुक्यातील होर्डिंग एक तर पूर्णपणे बंद करावेत अन्यथा होर्डिंग उभारणीची परवानगी मागणाऱ्या कोणत्याही अर्जाने होर्डिंगचे ठिकाण स्ट्रक्चर इंजिनिअरकडून करवून घ्यावे.


रस्ते विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच असे होर्डिंग उभे करणे आवश्यक आहे. अन्यथा अनधिकृत होर्डिंगवर प्रशासनाने तातडीने कारवाई केली पाहिजे.
- जनाबाई गोळे, माजी सरपंच, पिरंगुट

तालुक्यातील अनधिकृत होर्डींगवर कारवाईबाबत संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांना आजच सूचनापत्र काढून आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पुढील अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सध्याच्या आकडेवारीत ज्या गावांच्या हद्दीत होर्डिंग आहेत. परंतु त्यांच्या नोंदी पंचायत समिती कार्यालयाकडे आलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी ग्रामसेवकांच्या सभेत माहिती मागविली जाईल.
- सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

आकडे सांगतात (होर्डिंगची संख्या)
हिंजवडी- ११५, माण- ७२, भुकूम- ३८, कासारसाई- ७, भूगाव- १५, उरवडे- ३, अंबडवेट- ४, चांदे- ५, नांदे- ८, मारुंजी- २८, रिहे- १, नेरे- ७, भोडे- ३, कोंढावळे- २, लवळे- ३, पिरंगुट- ३३, पौड- १५, कासार आंबोली- ५, घोटावडे- ७.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT