पुणे

शेतीला तंत्रज्ञानासह सेंद्रिय पद्धतीची जोड देण्याची गरज

CD

पौड, ता.११ : ‘‘शेतकऱ्यांनी माती आणि पाणी याची तपासणी करून घेतली पाहिजे. शेतकरी भरपूर कष्ट करतो. त्याला दिशा देण्याचे काम बीव्हीजी ग्रुप करतो. विषमुक्त शेती आणि निरोगी भारतासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाला तंत्रज्ञानाची आणि सेंद्रिय पद्धतीची जोड देण्याची गरज आहे’’, असे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुप ऑफ इंडियाचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांनी केले आहे
पौड (ता. मुळशी) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने शेतकरी संवाद व मार्गदर्शन मेळाव्यात गायकवाड बोलत होते. यावेळी गायकवाड यांनी शेतीचे उत्पादन दुपटीने वाढविणे, शेती निरोगी ठेवणं. शेतात तयार झालेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळवून देणे. भाकड जनावरांचे दुधाळ जनावरांत रूपांतर करणे. माणसाचे आरोग्य निरोगी ठेवणे. यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना बीव्हीजी ग्रुपकडे असलेली औषधे, मशागत योजना याबाबत मार्गदर्शन केले.
सातारा जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी जालिंदर सोळस्कर यांनी सेंद्रिय शेती आणि बीव्हीजी ग्रुपच्या मार्गदर्शक तंत्रातून केलेल्या शेतीमुळे कसा भरघोस आर्थिक फायदा झाला याबाबत अनुभव सांगितले.
प्रास्ताविकात सुनील चांदेरे यांनी सांगितले की, जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी बँक आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज दिले जातं शेतकऱ्यांच्या भाताला नवीन बाजारपेठ मिळवून देण्याचे काम बँकेने केलं त्या माध्यमातून शेतकऱ्यांसह बँकेलाही चांगल्या प्रकारे फायदा झाला. बॅंक आणि बीव्हीजी ग्रुपच्यावतीने शेतकऱ्यांसाठी माती व पाणी परिक्षणाची सोय करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, कार्यक्रमात कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष (कै.) शरद निवृत्ती पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विभागीय अधिकारी सुरेश नांगरे, वसुली अधिकारी राजेंद्र मारणे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलं होते


यावेळी तालुक्याचे सहाय्यक निबंधक शिवाजीराव घुले, मधुराताई भेलके, माजी नगरसेवक माऊली तापकीर, ल्युपिन फाउंडेशनचे संदीप झनझने, स्वाती ढमाले, धैर्यशील ढमाले, विनायक ठोंबरे, सचिन अमराळे, आनंदराव घोगरे, सुनील कदम, महादेव मरगळे, संजय हुलावळे, माऊली कांबळे, लहू चव्हाण, विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सूत्रसंचालन केले.

03270

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT