पुणे

‘फिल्ट गार्ड’कडून नियमांचे पालन

CD

राहू, ता. ४ : फिल्ट गार्ड फिल्टर्स कंपनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून योग्य त्या परवानग्या घेऊन कारखाना चालवीत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नियमाप्रमाणे सर्वेक्षण करून अहवाल देतात. बॉयलरची उंचीदेखील नियमाप्रमाणे असून, कंपनीबाबत कोणत्याही शेतकऱ्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कधीही तक्रार केलेली नाही. कंपनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे., असा खुलासा फिल्ट गार्ड फिल्टर्स कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक व मनुष्यबळ संशोधन विभागाचे रमेश माळी यांनी केला.
दौंड तालुक्यातील नांदूर आणि सहजपूर परिसरातील कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तसेच, स्थानिकांना रोजगार दिला जात नाही, तो मिळण्याच्या मागणीसाठी येथील चार तरुणांचे फिल्ट गार्ड फिल्टर्स कंपनीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत माळी यांनी कंपनीच्या वतीने खुलासा केला. याबाबत त्यांनी सांगितले की, फिल्ट गार्ड फिल्टर्स कंपनी सन १९८७ पासून काम करत आहे. कंपनीने ८५ टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून कामे दिली आहेत. कंपनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. काही वैयक्तिक स्वार्थापोटी कंपनीला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. कंपनीने सामाजिक उपक्रमांतर्गत नांदूर, सहजपूर येथील सामाजिक आणि मूलभूत कार्याला नेहमीच हातभार लावलेला आहे. काही वर्षांपासून कंपनीची बदनामी करण्याचा नाहक प्रयत्न होत आहे. कंपनीने मोठा प्रकल्प कर्नाटकमधील धारवाड येथे सुरू केला आहे. विनाकारण कंपनीच्या व्यवस्थापनाला वेठीस धरण्याचे काम येथील काही स्थानिकांकडून वारंवार होत आहे. कंपनीला स्थानिकांनी जादा सहकार्य केल्यास अजून येथील तरुणांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर आमचा भर राहील. कंपनी परिसरात भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

उपोषकर्त्यांशी तहसीलदारांची चर्चा
दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी उपोषणकर्त्यांची भेट दिली असून, योग्य त्या कागदोपत्राची पूर्तता करा. कागदोपत्रांची खातरजमा झाल्यास उपोषणकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे उपोषणकर्ते उमेश म्हेत्रे यांनी सांगितले. जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असे उपोषणकर्ते उमेश म्हेत्रे, योगेश बोराटे, सोमनाथ बोराटे, राजेश पारवे यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT