पुणे

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

CD

राजेगाव, ता. ६ : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सन २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
शुक्रवारी (ता. ७) गटशिक्षणाधिकारी हे शाळा पूर्वतयारीसाठी तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व गटसाधनकेंद्र कर्मचारी यांची बैठक आयोजित करणार आहेत.
सोमवारी १० जून रोजी केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांची बैठक आयोजित करणार आहेत. सुट्टीमुळे शिक्षक बाहेरगावी गेल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्यक्ष बैठक आयोजित करणे शक्य नसल्यास ऑनलाइन बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
११ जून ते ते १२ जून या कालावधीत सर्व शिक्षकांनी शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची कल्पना पालकांना देण्यात यावी. सर्व मुख्याध्यापक यांनी आवश्यक ती सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून घ्यावीत. पुस्तके उपलब्ध न झाल्यास अथवा कमी मिळाल्यास वरिष्ठांच्या निदर्शनास आणावे. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यासाठी नियोजन करावे. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था ग्रामस्थ, पालक यांच्या माध्यमातून वह्या, पुस्तके, स्टेशनरी आदी साहित्य उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे व भेटी घेणे.
१३ जून ते १४ जून या कालावधीत शालेय इमारत, वर्गखोल्या व शालेय परिसराची स्वच्छता करून घेणे, पहिल्या दिवशी १०० टक्के मुले उपस्थित राहण्यासाठी पालक/गृहभेट घेणे. पहिल्या दिवशी सर्व मुलांना शालेय पोषण आहार मिळेल यासाठी नियोजन करणे. १६ जून रोजी नवगतांचे स्वागत करणे, सर्व पालक, ग्रामस्थ व गावातील इतर मान्यवर यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करणे. पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके/साहित्य यांचे वितरण करणे, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन कमिटी प्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक, यांना निमंत्रित करणे.
गटशिक्षणाधिकारी यांनी वरील सूचनांप्रमाणे कार्यवाही होत आहे, याची खात्री करावी व शाळा पूर्वतयारी व नवगतांच्या स्वागताचे फोटो संकलित करावेत व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याची प्रसिद्धी करावी. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व सर्व शिक्षक यांनी शाळा पूर्व तयारी कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे परिपत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT