school uniform sakal
पुणे

Student Uniform : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश

पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ६० हजार १६७ पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर - पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ६० हजार १६७ पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेषासाठी ४ कोटी ८० लाख ५० हजार १०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तो विद्यार्थी संख्येप्रमाणे तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधले इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती मधील मुले, दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांच्यासाठी मोफत गणवेशाची योजना राबविण्यात येते.

त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांमधील पात्र विद्यार्थांना दोन गणवेषासाठी ६०० रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असते. मात्र, यंदा यामधील एका गणवेशाचा निर्णय शासनस्तरावर होणार आहे. तर, १ गणवेषासाठी प्रती विद्यार्थी ३०० रुपयांचे अनुदान निधी वितरित केला आहे. त्यामुळे मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नविन गणेश मिळणार आहे.

समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून, दरवर्षीप्रमाणे, याही वर्षी पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. निधीही सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे. तसेच याबाबत आवश्यक त्या सूचना सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. शाळा स्तरावर याबाबत तयारी सुरू आहे. तूर्तास, सध्या प्रत्येकी एक गणवेश विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळेल, असे नियोजन सध्या आहे. दुसऱ्या गणवेशाबाबतीत शासनस्तरावरून सूचना येणार आहेत, त्यानंतर त्या बाबतीत शाळांना कळविण्यात येईल.

- कमलाकांत म्हेत्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

ही योजना चांगलीच आहे. परंतु, यामध्ये विद्यार्थी भेदभाव न करता ज्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात, त्याप्रमाणे सर्वांना गणवेश द्यावा. या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा.

- दत्तात्रेय वाळुंज, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ

तालुकानिहाय पात्र लाभार्थी व अनुदान

तालुका.... पात्र लाभार्थी..........अनुदान

आंबेगाव - ८१९२ - २४ लाख ५७ हजार ६००

बारामती - ११५६७ - ३४ लाख ७० हजार १००

भोर - ६२८९ - १८ लाख ८६ हजार ७००

दौंड - १२९६७ - ३८ लाख ९० हजार १००

हवेली - १९९७० - ५९ लाख ९१ हजार

इंदापूर - १२८५९ - ३८ लाख ५७ हजार ७००

जुन्नर - १३७२४ - ४१ लाख १७ हजार २००

खेड - २३२७३ - ६९ लाख ८१ हजार ९००

मावळ - १३३३८ - ४० लाख १ हजार ४००

मुळशी - १०५५० - ३१ लाख ६५ हजार

पुरंदर - ६५७५ - १९ लाख ७२ हजार ५००

शिरूर - १८७८१ - ५६ लाख ३४ हजार ३००

वेल्हे - २०८२ - ६२ लाख ४६ हजार

एकूण - १६०१६७- ४ कोटी ८० लाख ५० हजार १००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT