पुणे

लोणी देवकरमधील कंपनीची साडेचौदा लाखांची फसवणूक

CD

इंदापूर, ता. ७ : लोणी देवकर (ता. इंदापूर) औद्योगिक वसाहतीतील ‘वाय ॲक्सिस स्ट्रक्चरल स्टिल्स’ या कंपनीची साडे चौदा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरी (ता. पुरंदर) येथील ‘श्रवण इंजिनिअरिंग’ या कंपनीच्या मालकाविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कंपनीचे सहायक व्यवस्थापक संजय जालींदर भोसले (रा. रणगाव, रणमोडवाडी, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जेजुरी येथील श्रवण इंजिनिअरिंग कंपनीचे मालक विश्वास नारायण पवार (रा. जेजुरी) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी ‘वाय ॲक्सिस स्ट्रक्चरल स्टिल्स’ कंपनीकडून तब्बल २६ लाख ५७ हजार १७६ रुपयांचे एम. एस. फ्लॅट व एम. एस. स्केअर बार खरेदी केले होते. त्यापैकी १२ लाख ६ हजार रुपये दिले, मात्र उर्वरित १४ लाख ५१ हजार १७७ रुपये वारंवार मागूनही आरोपीने उरलेली बाकी देण्यास नकार देत आपल्याला फोन न करण्याची धमकी दिली. तसेच, आरोपीने आपल्या कंपनीच्या नावे बँक ऑफ बडोदाचा दिलेला १० लाखांचा धनादेशही आरोपीकडून पेमेंट थांबवण्यात आल्याचे कारण देत बँकेकडून फेटाळण्यात आला. त्यावरून गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT