पुणे

वैष्णवांनी अनुभवला रिंगण सोहळा

CD

इंदापूर, ता. १० : वेगाने धावणारे झेंडेकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, टाळ मृदंगाचा गजर, वीणा घेऊन धावणारे वैष्णव आणि वायुवेग घेतलेला अश्‍व असा अभूतपूर्व सोहळा तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने इंदापूरमध्ये लाखो वैष्णवांनी अनुभवला.
अश्‍व धावे अश्‍वामागे । वैष्णव उभे रिंगणी ।
टाळ मृदंगा संगे । गेले रिंगण रंगुनी ।।
या उक्तीचा याची देही याची डोळा वारकऱ्यांनी अनुभव घेतला.
इंदापूरला दरवर्षी पालखीचे दोन मुक्काम असतात मात्र यंदा तिथीचा क्षय झाल्याने एकच मुक्काम आहे. यामुळे शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता. १०) इंदापूर शहरात मुक्कामासाठी आगमन झाले. दरम्यान सकाळी रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. रांगोळी काढून फुलांचा सडा टाकत. इंदापूरकरांनी वैष्णवांचे स्वागत केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे, भाजप नेते आणि राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मवीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, माजी नगराध्यक्षा अलका ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे महारुद्र पाटील, नगरसेवक पोपट शिंदे, अनिकेत वाघ, कैलास कदम, अमोल भिसे, विठ्ठल ननवरे, माऊली चवरे, पोपट पवार, ॲड. आशुतोष भोसले, प्रा. कृष्णा ताटे, इनायत काझी यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
रिंगण सोहळ्यात देव रिंगण, टाळकरी रिंगण, विणेकरी रिंगण झाले. माउलींच्या जयघोषात तुळशीवृंदावन डोक्यावर घेत वारकऱ्यांनी रिंगणाभोवती फेरा लावला. या सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात नव्याने उभारण्यात आलेल्या पालखी मुक्काम स्थळी विसावला.

हर्षवर्धन पाटील, राहुल शेवाळे यांचे सारथ्य
राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथाचे सारथ्य करीत रथ रिंगण सोहळास्थळी आणला. त्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते मानाच्या अश्‍वाचे पूजन करण्यात आले.

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही घेतला सहभाग
इंदापूर येथील रिंगण सोहळ्यानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी पोलिस तसेच विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार यांनीही रिंगण सोहळ्यात सहभागी होत पालखीला प्रदक्षिणा घातली. याप्रसंगी त्यांनी रिंगणाच्या भजनात तल्लीन होत वारकऱ्यांसोबत फुगडी घालण्याचाही आंनद लुटला. या सोहळ्यानिमित्ताने इंदापूर मधील वातावरण हे भक्तिमय झाले होते.

डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा
इंदापूरमध्ये माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना दाखल होताच. वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब होऊन गेला. रिंगण लावून झाल्यानंतर चोपदारांनी हात उंचावून इशारा करताच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा गजर झाला. रिंगणातून अश्‍व एका पाठोपाठ धावत सुटले. रथापुढील आणि मागील दिंड्यांपर्यंत धावत जाऊन अश्‍वांनी माघारी येत दौड घेतली. लक्ष-लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अश्‍वांच्या दौडीने आषाढी वारीतील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला. महिला भाविकांसह वारकऱ्यांनी फुगड्यांचा फेर धरत आणि पारंपरिक खेळ करत रिंगण
सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT