पुणे

पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना हमखास उत्तरे

CD

सोमेश्वरनगर, ता. ८ : दहावी-बारावीनंतर नेमके काय करावे, कुठल्या संस्थेत प्रवेश घ्यावा, कोर्सची निवड कशी करावी? अशा पालक व विद्यार्थ्यांना संभ्रमित करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये दोन दिवस विद्यार्थ्यांना मिळाली. या एक्स्पोचा रविवारी (ता. ९) शेवटचाच दिवस असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बारामती येथे अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट प्रायोजित व आचार्य ॲकॅडमी प्रस्तुत, तसेच पेस आयआयटी अँड मेडिकलच्या सहप्रायोजकत्वाने; तर दत्तकला शिक्षण संस्था व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहयोगाने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो'' ७ ते ९ जून या कालावधीत आयोजित केला आहे. रविवारी या एक्स्पोचा अंतिम दिवस आहे. या एक्स्पोमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक आहेतच, शिवाय नामांकित शिक्षण संस्थांच्या स्टॉलचा अंतर्भाव केला आहे. दोन दिवस असंख्य विद्यार्थी, पालक यांनी एक्स्पोला भेट देऊन करिअर निवडले, तसेच शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी स्वतःच्या ज्ञानात, माहितीत भर घातली. आजूबाजूच्या तालुक्यातील विविध शाळांनी एकत्रितपणे भेट दिली. करिअरबाबत सल्ला देणारे तज्ज्ञ, शिक्षण समुपदेशक यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी आणि अनेक संस्थांची माहिती जाणून घेण्यासाठी रविवारी शेवटची संधी आहे.

दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांचे आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो. अशा वेळी सकाळ एक्सपो उपक्रम नक्कीच विद्यार्थी व पालकांना करिअर निवडण्यासाठी फायद्याचा ठरेल. तसेच, बऱ्याचदा बारावीनंतर कोण-कोणती क्षेत्र आहेत, हे विद्यार्थ्यांना पूर्ण माहीत नसते. तेव्हा तर मार्गदर्शन हवेच असते. एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांना शंका दूर होण्यास नक्कीच मदत होईल. येथे तज्ज्ञ मार्गदर्शकांची होणारी व्याख्याने करिअर निवडण्यासाठी दिशादर्शक ठरतील.
- डॉ. धनंजय गणपती ठोंबरे,
सचिव, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ

सकाळ एज्युकेशन एक्स्पो विद्यार्थ्यांना करिअरबाबत अत्यंत अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः माहितीचा अभाव असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत आवश्यक उपक्रम आहे. शाळांनी पुढाकार घेऊन भेट द्यावी.
- विठ्ठल नामदेव कदम,
मुख्याध्यापक, रिसे-पिसे माध्यमिक विद्यालय (ता. पुरंदर)

एक्स्पोमध्ये काय आहे?
- नीट-जेईई-सीईटी यापैकी काय करावे आणि कुठे शिकावे, याबाबत प्रत्यक्ष अनेक अकादमी मार्गदर्शनासाठी उपलब्ध
- मेडीकल, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आयआयटी, आयटी, अॅनिमेशन अशा तांत्रिक कोर्सबाबत मार्गदर्शन
- कृषी, फार्मसी, एमबीए, व्यावसायिक शिक्षण या शाखांमधील विविध कोर्स एका छताखाली
- कला, वाणिज्य, विज्ञान क्षेत्रातील संधींबाबत सल्ला देणारे तज्ज्ञ
- पुणे, बारामती, इंदापूर, पिंपरी चिंचवडमधील नामांकित शिक्षणसंस्थांचे स्टॉल
- शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज कसे मिळवावे याबाबत जिल्हा बँकेची इत्थंभूत माहिती

एक्स्पो कधी आणि कुठे?
वेळ- ९ जून रोजी सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत.
ठिकाण- मुक्ताई लॉन्स, सिटीईन चौक, बारामती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT