पुणे

मोटारीची काच फोडून दोन लॅपटॉपची चोरी

CD

शिरूर, ता. ८ : येथील बोऱ्हाडे मळ्यातील समर्थ लॉन्स मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप व रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (ता. ७) सायंकाळी प्रकार घडला.
याबाबत स्वप्नील गजानन घरडे (रा. खराडी, चंदननगर, पुणे) यांनी फिर्यादी दिली. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मूळचे अकोला येथील राहणारे घरडे हे आपल्या परिचिताच्या विवाह समारंभासाठी बोऱ्हाडे मळा येथे आले होते व त्यांनी समर्थ लॉन्स मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये त्यांची मोटार लावली होती. विवाह समारंभ उरकल्यानंतर, सायंकाळी घरी जाण्यासाठी मोटारीजवळ आले असता, मोटारीच्या दरवाजाची काच फुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी मोटार उघडून पाहिले असता, मोटारीतील एक ७५ हजार रुपये किमतीचा व एक १५ हजार रुपये किमतीचा असे दोन लॅपटॉप, अडीच हजार रुपये किमतीचे हार्ड डिस्क, १२ हजार रुपये रोख व इतर छोट्या वस्तू आणि कागदपत्रे असलेली बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेतली.
पुढील तपास सहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT