पुणे

मॉन्सून लांबल्याने शेतकरी चिंतातूर

CD

सासवड, ता.१८ : खरीप हंगामाच्या मशागतीची कामे उन्हाळ्यातच उरकली. मात्र, पुरंदरसह जिल्ह्यात आतापर्यंत कुठे पेरणी, लावणीची लगबग शेतशिवारात दिसायला हवी होती. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुरंदर तालुक्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र ३१ हजार ९२० हेक्टर आहे. मात्र, अद्यापपर्यंत केवळ एक टक्का वगळता. तालुक्यातील ९९ टक्के क्षेत्रातील पेरणी मॉन्सूनअभावी रखडल्याने खरीप धोक्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यात सर्वाधिक बाजरीचे सरासरी क्षेत्र १२ हजार ३२७ हेक्टर आहे. मात्र प्रारंभीचा पाऊस गेली काही वर्षे ताण देत आहे. त्यामुळे हे क्षेत्र घटत गतवर्षी फक्त ८,७३५ हेक्टर क्षेत्रावरच खरीप बाजरी पेरली झाली. त्यामुळे यंदा कृषी विभागाने बाजरीचे प्रस्तावित क्षेत्र ८,५०० हेक्टरच गृहीत धरले आहे. मागील वर्षी २,७६८ हेक्टरवर वाटाणा घेतला गेल्याने, यंदा वाटाण्याचे प्रस्तावित क्षेत्र कृषी यंत्रणेने २,८०० हेक्टर गृहीत धरले आहे. सोयाबीन क्षेत्र पूर्वी ३११ हेक्टर होते. गतवर्षी खरिपात सोयाबीन १,५९४ हेक्टरवर घेतले गेले. त्यामुळे प्रस्तावित सोयाबीन क्षेत्र या खरिपासाठी १,६०० हेक्टर गृहीत धरुन अहवाल तयार आहे. भाताचे क्षेत्र सरासरी राखून असल्याने यंदा १,२१० हेक्टर भात क्षेत्र नियोजनात आहे. भुईमूग क्षेत्र २,५०० हेक्टर प्रस्तावित आहे, असे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी `सकाळ` शी बोलताना सांगितले.

पाऊस लांबल्याने ढेकळं फुटली नाही, पूर्वमशागत नाही, पेरणी नाही.. झोप उडाली आहे. अंजीर सीताफळ व इतर फळबागांना खत देऊन आळी केली. फळबाजी, पालेभाजीसाठी बेड करून ठेवले. बहर कसा धरायचा ही चिंता आहे., असे शेतकरी शंकर झेंडे, बाळासाहेब टिळेकर, माऊली मेमाणे, हनुमंत सोळसकर, नंदकुमार जगताप, बाबा पवार, मच्छींद्र जाधव, मुरलीधर झेंडे आदींनी चिंताक्रांत होऊन सांगितले.

मार्च - एप्रिलमध्ये जो अवकाळी किंवा वळवाचा पाऊस बरा झाला. तसा मे महिन्यात अपेक्षित असा चांगला पाऊस तालुक्यात सर्वत्र झाला नाही. त्यातच सात - आठ जूनला जे मॉन्सूनचे आगमन होणार होते. ते सध्या बरेच लांबणीवर पडले आहे. त्यातून बोटावर मोजण्याइतक्या शेतकरी वर्गाने जे बियाणे, खते व गरजेच्या निविष्ठा घेऊन ठेवल्यात., ते सध्या तसेच पडून आहे. तर ८५ ते ९० टक्के शेतकऱ्यांनी पाऊस नसल्याने बियाणेच खरेदी केले नाही.
- महेंद्र गिरमे, कृषी अधिकारी, पुरंदर तालुका पंचायत समिती


शंभर मिलिमीटर पाऊस झाला तरच चांगली ओल शेतजमिनीत खोलवर जाते व पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवण चांगली होते. त्याकरिता २० ते ३० मिलिमीटरचे किमान चार-पाच पाऊस होण्याची वाट पाहावी लागेल. ज्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता (चाचणी) केली नसेल, तर त्या चाचण्या उर्वरित शेतकऱ्यांनी करून घ्याव्यात.
- दिलीप झेंडे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
जूनच्या पंधरवड्यात सासवडला ६८ मिलिमीटर पाऊस पडला परंतु, उन्हाचा चटका इतका होता की, जमिनीत ओल गेलीच नाही. शिवाय सासवड शहर सोडून इतर शेजारील गावांत किंवा कृषी मंडलात तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्याइतपत ओल ९० ते ९५ टक्के गावांत नाही. जूनचा पाऊस भरवस्याचा नसतो, त्यातून शेतकरी पक्का मॉन्सून सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत, असे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी सांगितले.

03729

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT