पुणे

आनंद घ्या, पण साहस टाळा

CD

टाकवे बुद्रूक, ता. ६ : पावसाळा सुरू झाला आहे आणि निसर्गप्रेमींची, पर्यटकांची भटकंती सुद्धा. अनेकांनी सध्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळांना भेट देणे चालू केले आहे. त्यात काही धोकादायक ठिकाणांचाही समावेश आहे. मागील काही घटना पाहता या धोकादायक ठिकाणी सेल्फी व रील्सच्या नादात, दारूच्या नशेत, अतिउत्साहीपणामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. त्यासाठी पर्यटकांनी या पावसाळी हंगामात भटकंतीचा आनंद जरा जपूनच करायला हवा.

काही दिवसांपूर्वी भुशी धरण परिसरात मोठी दुर्घटना घडली, त्यात पाच जणांचा जीवही गेला. मुळशीतील प्लस व्हॅलीतील कुंडात एकजण वाहून जाऊन मृत्यूमुखी पडला. दरम्यान, शुक्रवारी (ता. ५) कार्ला येथील इंद्रायणी नदी ओलांडताना एक व्यक्ती वाहून गेली आहे. ही नुकतीच पावसाळ्याची सुरवात असतानाच अशा घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. त्यामुळे भटकंतीच्यावेळी प्रत्येक ठिकाणी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यातील धोकादायक ठिकाणे
- ढाक बहिरी
- प्लस व्हॅली
- कुंडलिका व्हॅली
- कांब्रे लेणी
- सांधन दरी
- काळू धबधबा
- कुंभे धबधबा
- हरिहर किल्ला
- जिवधन किल्ला
- कलावंतीण किल्ला
- कोकणकडा
- घनगड
- मृगगड
- चंदेरी
- धोडप
- भैरवगड
- कातळधार धबधबा

पावसाळ्यातील सुरक्षित ठिकाणे
- लोहगड
- कार्ला, भाजे व बेडसे लेणी
- हडसर
- नाणेघाट
- राजगड
- रायगड
- शिवनेरी
- कोरीगड
- तुंग
- तिकोना
- भाजे धबधबा

भटकंती करताना अशी घ्या काळजी
- एकट्याने भटकंतीचा ट्रेक टाळावा
- भटकंती करण्याअगोदर कुटुंबास कळवा
- भटकंतीच्या ठिकाणी जाण्याअगोदर भौगोलीक अभ्यास करा
- भटकंती करतेवेळी स्थानिक गाइड किंवा वाटाड्या सोबत असावा
- पाण्याच्या प्रवाहात जाण्यास व पोहण्यास टाळा
- बॅगमध्ये एखादी रस्सी आणि प्रथमोपचार किट ठेवा
- सोबत अधिक जास्त कपडे ठेवा
- मद्यपान व अतिउत्साहीपणा टाळा
- जंगली मच्छरांपासून बचावासाठी संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करा
- पाय घसरू नये म्हणून ट्रेकिंगचे बूट वापरा
- धबधब्याखाली जाणे टाळा

वाट चुकल्यास काय करावे
- प्रथमतः घाबरू नका
- ज्या रस्त्याने आलात त्या रस्त्याने मागे जा
- मोबाईलला नेटवर्क असेल तर स्थानिक रेस्क्यू बचाव संस्थेशी संपर्क साधा
- जे मदतीसाठी येणार आहेत त्यांना लोकेशन पाठवून त्याच ठिकाणी थांबा
- मोबाईलच्या बॅटरीचा जास्त वापर न करता ती टिकवून ठेवा

रिल्सचा नाद आणि ड्रोनचे शूट
अलीकडे रील्स बनवून प्रसिद्ध करण्याचे नवीन फ्याड आलं आहे. त्यासाठी अनेक भटकंतीवेडे सह्याद्रीमध्ये एकटे तसेच ग्रुपमध्ये भटकंती करत आहेत. त्यातच स्वतःची रील्स प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण ड्रोनचा वापर करताना दिसत आहेत. त्यासाठी धोकादायक ठिकाणी जाणे, एखाद्या उंच दगडावर उभे राहणे असे प्रकार होत आहेत.

आपत्कालीन संपर्क
- ९८२२५ ००८८४ ( शिवदुर्ग मित्र लोणावळा )
- ९८२२५ ५५००४ ( वन्यजीवरक्षक मावळ संस्था )
- १०७७ (जिल्हा आपत्ती नियंत्रण )

‘‘पावसाळ्यात बऱ्याचशा नवीन संस्था भटकंतीअगोदर ठिकाणांची देखरेख न करता ट्रेकचे नियोजन करत असतात. त्यामुळे माहितीचा अभाव निर्माण होतो आणि काही अपघात घडतात. तर काहींना आपला जीव गमवावा लागतो.’’
- संतोष दहिभाते, दुर्गप्रेमी

‘‘लोणावळ्यातील झालेली दुर्घटना पाहता, मुख्य पर्यटनस्थळ भुशी डॅमच्या ओव्हरफ्लो पायऱ्या असताना पर्यटक त्यामागील ओढ्यावर जाणेच चुकीचे होते. ते ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी प्रवाह असताना मधोमध जाऊन बसले. पाऊस अधिक झाला आणि पाण्याचा प्रवाह वाढून ही दुर्घटना घडली. शासनाने धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावले पाहिजेत. पर्यटकांनी माहीत नसलेल्या ठिकाणी जाणे टाळावे अथवा त्या ठिकाणच्या भौगोलिक, नैसर्गिक धोक्यांची माहिती घेऊन जावे. एखाद्या सेल्फीसाठी अथवा कोणाची तरी रिल बघून, स्वतः रिल बनवण्यासाठी नको ते धाडस करू नये.’’
- आनंद गावडे, शिवदुर्ग मित्र, लोणावळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT