ओतूर, ता.१९ : ''मधमाशी पालन करून शेतकऱ्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती करावी. मधमाशी पालनाने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल'', असे प्रतिपादन पुणे येथील केंद्रीय मधमाशी पालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे मास्टर ट्रेनर हेमंतकुमार डुंबरे यांनी केले.
जागतिक मधमाशी दिनाच्या पाश्र्वभूमीवर ''सकाळ''च्या ओतूर प्रतिनिधीशी बातचीत करताना ते पुढे म्हणाले, की वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांसाठी परागीभवन होणे फार गरजेची गोष्ट आहे. जवळपास ८५ टक्के परागीभवन हे मधमाशी करते आणि म्हणूनच मधमाश्या पालन करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
मधमाश्या एकूण पाच प्रकारच्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये सापडतात. त्याचे वर्गीकरण करायचे असल्यास उजेडात राहणाऱ्या मधमाश्या (पेटीमध्ये पाळू शकत नाही) आग्या मोहोळ माशी आणि फुलोरी मधमाशी आणि अंधारात राहणाऱ्या मधमाश्या (पेटीमध्ये पाळू शकतो) सातेरी मधमाशी, मेलीफेरा मधमाशी आणि डंखारहित मधमाशी ; अशा पाच प्रकारच्या मधमाश्या महाराष्ट्रामध्ये सापडतात.
शेतकऱ्यांना स्वतःसाठी मधमाशी पाळायची असेल तर सातेरी (भारतीय) मधमाशी किंवा डंखरहित मधमाशा पाळाव्यात. मधमाशी पालन करायचे असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडांची आवश्यकता आपल्याला पडते. आपल्या परिसरामध्ये, घराभोवती, शेतीमध्ये किंवा शेताभोवती मधमाशीला योग्य अशा फुलझाडांची लागवड करावी.
मधमाशी पालन करायचे असेल तर मधमाशी पाळायचा बॉक्स , स्टॅन्ड, जाळीची टोपी, हाएव्ह टूल, गरजेनुसार मध काढायचे यंत्र, इत्यादी छोट्या-मोठ्या गोष्टींची आवश्यकता पडते.मधमाश्यांना किडी व रोग येतात त्यांच्यावरील उपचार पद्धती माहिती असणे गरजेचे आहे .
मधमाशी पालनाचा फायदा
* मध * मेण, *परागकण * रॉयल जेली * प्रोपोलीस * मधमाशीचे विष * विधि उत्पादन
मधमाशी पालनासाठी याचे मिळते मार्गदर्शन
* मधपोळ्याची वैज्ञानिक रचनांचा अभ्यास
* मधाच्या अनुषंगाने फुलांच्या झाडाची लागवड
* मधमाशी पालनासाठी योग्य असणारी अवजारे
* कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण,
* विविध हंगामात पेटीची घ्यावयाची काळजी
* पेटीची हाताळणी व निरीक्षण आणि सरकारच्या मधमाशी पालनाच्या योजना
04218
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.