पुणे

फ्लॉवरच्या निच्चांकी भावामुळे शेतकऱ्यांना फटका

CD

ओतूर, ता.१ : ओतूर (ता.जुन्नर) परिसरातील शेतकरी फ्लॉवरला मिळत असलेल्या निच्चांकी बाजारभावामुळे अडचणीत आला आहे. फ्लॉवर विक्रीतून उत्पादन खर्चही मिळणे मुश्कील झाले आहे. एकंदरीतच या वर्षी कांदा, बटाटा, टोमॅटो, गाजर व फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना निच्चांकी बाजारभावामुळे आर्थिक फटका बसला आहे.
याबाबत फ्लॉवर उत्पादक शेतकरी मच्छिंद्र हरिभाऊ शिंदे म्हणाले, की मागील वीस दिवसांपूर्वी फ्लॉवरला दहा किलोला शंभर रुपये बाजारभाव मिळत होता. त्यात उत्पादन खर्च कसा बसा भागत होता. मात्र फ्लॉवरचे बाजारभावात घसरण होतच राहिली. एक नंबर प्रतीच्या फ्लॉवरला बुधवारी (३० ता.) दहा किलोला पन्नास रुपये बाजारभाव मिळत असून नाशवंत पीक असल्याने शेतकरी तोटा होत असताना ही फ्लॉवर काढून विक्री करत आहे. फ्लॉवर तोडणीसाठी शेतमजूर साठ रुपये गोणीने पैसे घेतात. एका गोणीचे दोनशे रुपये मुश्किलीने होत असून, फक्त तोडणी व वाहतूक आणि पिशवी याचा खर्च कसा बसा भागत आहे. मात्र फ्लॉवर लागवडीला शेतीची मशागत, सरी पाडणे, रोप, खते, औषध फवारणी,पाणी भरणे असा एकरी अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये झालेला खर्च हा या निच्चांकी बाजारभावामुळे शेतकऱ्याला तोटा म्हणून सहन करावा लागत आहे.
ओतूर व परिसरात फक्त फ्लॉवर मुळे कोट्यवधीची उलाढाल होत असते. मात्र निच्चांकी बाजारभाव मुळे इतर पिका सारखेच फ्लॉवर उत्पादक शेतकरी ही आर्थिक अडचणीत आला आहे.
सोबत फोटो.
04260

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT