पुणे

किरकोळ वादातून मित्राला दगड, हुकाने बेदम मारहाण

CD

उरुळी कांचन, ता. १६ : दारू पिल्यानंतर दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या वादात डोक्यात दगड व लोखंडी हुकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील माळीमळा परिसरात मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुलाब सतीश परदेशी (वय ३२) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. अंकुश बाजीराव मगर (वय ५५, दोघेही रा. माळीमळा), असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब परदेशी हे मोलमजुरी करतात, तर अंकुश मगर हा लोणी काळभोर येथील सिमेंटच्या मालधक्क्यात हमाल म्हणून काम करतो. हे दोघे मित्र आहेत. दोघांनाही दारूचे व्यसन आहे. मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परदेशी यांना मगर याने दारू पिण्यासाठी बोलावले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत असताना, ‘तुझ्या खिशामध्ये काय आहे?’ असे म्हणून परदेशी याने मगर याच्या अंगाशी झटापट केल्याने मगर याने परदेशी याला शिवीगाळ केली. मगर याने त्याच्या हातात असलेल्या सिमेंट पोती उचलण्याच्या हुकाने परदेशी यांना मारहाण केली. यात त्यांच्या हाताच्या कोपऱ्याच्या बाजूस आणि डोक्यात दगड मारुन जखमी केले. तसेच, ‘तुला दोन दिवसांत मारुन टाकतो’ अशी धमकी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT